नांदेड: नांदेड महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला. मात्र, तरोडा परिसरात या जल्लोषाला गालबोट लागले आहे. भाजपचे पराभूत उमेदवार दीपक पाटील यांच्या घरासमोर १८ जानेवारीच्या मध्यरात्री विजयी उमेदवाराचे वडील आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह फटाके फोडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकी घटना काय? तरोडा भागातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेले दीपक पाटील यांचा पराभव झाला आहे. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी मध्यरात्री त्यांच्या घरासमोर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, वैभव मठपती, संदीप जनकवाडे आणि शेकापुरे हे चार जण आले. त्यांनी फटाके फोडून गोंधळ घातला. इतकेच नाही तर, "तुझा संतोष देशमुखसारखा गेम वाजवू," अशी धमकीही दिल्याचे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
व्हिडीओ व्हायरल, राजकीय वातावरण तापलेया संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. यामध्ये घरासमोर फटाके वाजवले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दीपक पाटील यांनी या पुराव्यासह भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी केवळ 'अदखलपात्र' गुन्ह्याची नोंद केली आहे. निवडणूक संपल्यानंतरही अशाप्रकारे वैयक्तिक द्वेष काढला जात असल्याने नांदेडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीत हार-जीत होत असते, मात्र पराभूत उमेदवाराच्या कुटुंबाला अशाप्रकारे दहशतीखाली ठेवणे किती योग्य, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Web Summary : In Nanded, a defeated BJP candidate received death threats after alleged supporters of a winning candidate set off fireworks outside his home. The incident, captured on CCTV, has sparked outrage, raising concerns about post-election intimidation. Police registered a non-cognizable offense.
Web Summary : नांदेड में, भाजपा के पराजित उम्मीदवार को कथित तौर पर जीतने वाले उम्मीदवार के समर्थकों द्वारा उनके घर के बाहर पटाखे फोड़ने के बाद जान से मारने की धमकी मिली। सीसीटीवी में कैद घटना से आक्रोश फैल गया, चुनाव के बाद डराने-धमकाने को लेकर चिंता बढ़ गई है। पुलिस ने गैर-संज्ञेय अपराध दर्ज किया।