शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

नांदेड जिल्ह्यातील शहरी मालमत्ताधारकांना सरसकट मावेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:17 AM

तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़

ठळक मुद्देजमीन अधिग्रहण : अर्धापूर, हदगाव, लोहा शहरातील मालमत्ताधारक होणार मालामाल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या वतीने राज्यामध्ये रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून ३६१ क्रमांकाच्या तुळजापूर-बुटीबोरी या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरु आहे. यासाठी अनेक शेतकºयांच्या जमिनीचे व शहरातील प्लॉटधारकांच्या मालमत्तेचे अधिग्रहण करण्यात येत आहे.हे अधिग्रहण करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना क्र.१६ (ब) व २९ (ब) या नियमांचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये ग्रामीण भागाला बाजारमूल्यांचा गुणांक २ तर शहरी भागास गुणांक १ प्रमाणे मावेजा दिला जातो. यामुळे ग्रामीण भागापेक्षा जास्तीच्या किमती असलेल्या शहरी भागातील प्लॉटधारकांना मात्र मावेजा कमी मिळत आहे. त्यासोबतच ज्या शेतकºयांची जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे. या शेतकºयांना सरसकट मावेजा न देता यासाठीचे विशिष्ट टप्पे पाडण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावाने जमिनी असताना मावेजा मात्र एकत्रित कुटुंबपद्धतीने देण्यात येत आहे. यामुळे जमीनधारकांवर मोठा अन्याय होत आहे. यासंदर्भात शेतकºयांनी अनेक आंदोलने केली.याची दखल घेवून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे अन्यायग्रस्त शेतकºयांची भूमिका समजून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरसकट मावेजा देण्यात यावा, शहरी भागासाठी २ गुणांकप्रमाणे मोबदला देण्याची मागणी केली़दरम्यानच्या काळात नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौºयावर आले असता १९ एप्रिल रोजी आ. डी. पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण व माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची विमानतळावर भेट घेवून सरसकट मावेजा देण्याची मागणी केली होती़यासंदर्भात २ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मावेजासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांना गुणांक २ प्रमाणे मावेजा देण्याची चर्चा झाली़ ग्रामीण भागापेक्षा या शहरातील प्लॉटधारकांना मावेजा कमी मिळत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे यामध्ये बदल करुन ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातसुद्धा मावेजा देण्यात यावा. पूर्वी दिलेला मावेजा व सध्या मंजूर करण्यात आलेला मावेजा यातील फरक काढून विभागीय महसूल आयुक्तांंच्या मान्यतेनुसार ही रक्कम प्लॉटधारकांना तात्काळ अदा करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत़---ज्यांच्या नावे सातबारा आहे, त्यांना...मावेजा देताना एकत्र कुटुंबपद्धती प्रमाणे न देता त्याऐवजी ज्यांच्या नावे सातबारा उतारा आहे, त्या व्यक्तींना हा मावेजा देण्यात यावा. रस्त्यासाठी जी जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे़ त्याचे टप्पे न पाडता सरसकट मावेजा देण्यात यावा. हे प्रकरण शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून यासाठीही खा.अशोकराव चव्हाण प्रयत्नशील आहेत. खा़ चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांसह ग्रामीण भागातील जमीनधारकांना न्याय मिळाला आहे़

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गfundsनिधी