भूकंपाच्या धक्क्याने नांदेड जिल्हा हादरला; केंद्रबिंदू हिंगोलीत, ४.७ रिश्टर स्केलची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:39 IST2026-04-11T12:35:31+5:302026-04-11T12:39:28+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंपमापक यंत्रावर ४.७ रिश्टर स्केलची झाली नोंद

भूकंपाच्या धक्क्याने नांदेड जिल्हा हादरला; केंद्रबिंदू हिंगोलीत, ४.७ रिश्टर स्केलची नोंद
नांदेड:नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 15 ते 20 सेकंद जाणवलेल्या या हादऱ्यांनी भिंतीवरील आरसे व अन्य साहित्य हलताना दिसल्याचे अनेकांनी सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंपमापक यंत्रावर त्याची नोंद झाली आहे. हा धक्का 4.7 रिश्टर स्केल असल्याची माहिती या विभागाचे प्रा. टी. विजयकुमार यांनी दिली.
नांदेड शहरातील मालेगाव रोड, श्रीनगर, काबरा नगर, वेदांत नगर, विजयनगर, सिडको- हडको आदीसह संबंध शहरात कमी अधिक प्रमाणात भूकंपाची तीव्रता नांदेडकरांनी अनुभवली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, लोहा, अर्धापूर तालुक्यातही भूकंप जाणवल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमावर व्हायरल झाल्या आहेत. शेजारील वसमत तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने सेल्फमधील भांडी पडल्याचे वृत्त आहे. तसेच पूर्णा परिसरातही भूकंप तीव्रतेने जाणवला. परिसर हदररल्याने भीतीने नागरिक घराबाहेर धावत सुटले. विशेषतः पशु ओरडत व जागीच उड्या घेत असल्याचेही दिसून आले.
EQ of M: 4.7, On: 11/04/2026 08:45:23 IST, Lat: 19.533 N, Long: 77.202 E, Depth: 10 Km, Location: Hingoli, Maharashtra.
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 11, 2026
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0@DrJitendraSingh@OfficeOfDrJS@Ravi_MoES@GSuresh_NCS@ndmaindiapic.twitter.com/YdkfbOFpT1
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात
शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास बसलेले भूकंपाचे धक्के तीव्र स्वरूपाचे होते. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे ता. वसमत परिसर होता. परिसरातील दीडशे किलोमीटर पर्यंत त्याचा परिणाम जाणवला. स्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरू नये. पुन्हा धक्के जाणवल्यास सुरक्षित स्थळी थांबावे अन्यथा शक्य असल्यास मोकळ्या जागी बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.