शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नांदेड जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी ३ हजार १८८ जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 19:19 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहाय्यित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जिल्ह्यातील २३४ शाळेत ३ हजार १८८ जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे़ 

नांदेड : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थ सहाय्यित शाळेत २५ टक्के आरटीई राखीव कोट्यातून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून जिल्ह्यातील २३४ शाळेत ३ हजार १८८ जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे़ 

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी हा प्रवेश निश्चित केला आहे़ नांदेडसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत नामांकित शाळेमध्ये २५ टक्के  प्रवेश दिला जात असला तरी अनेक शाळांनी आपले उद्दिष्ट गतवर्षी पूर्ण केले नव्हते़ त्यामुळे एक  हजारांहून अधिक जागा प्रवेशाविना रिक्त होत्या़ यावर्षी आतापासूनच प्रवेशासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे़ यासंदर्भात संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची बैठकही घेण्यात आली होती़ आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया करण्यासंदर्भात पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले होते़ त्यानुसार यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत़ 

वेळेत अर्ज करा : शिक्षण विभागाचे आवाहनअर्धापूर तालुक्यात १५ शाळांत २०५ जागा, भोकर - ५ शाळांत ६२, बिलोली -११ शाळांत २०१, देगलूर - १३ शाळांत १९७, धर्माबाद - ९ शाळांत ९४, हदगाव - ७ शाळांत ६३, हिमायतनगर -४ शाळांत ९९, कंधार - ८ शाळांत ९९, किनवट - १४ शाळांत ११२, लोहा - १७ शाळांत १२०, माहूर - ४ शाळांत ३५, मुदखेड - १२ शाळांत १८२, मुखेड - १० शाळांत ११५, नायगाव - १९ शाळांत ३१०, नांदेड तालुका - ४३ शाळांत ६११,नांदेड शहर - ३८ शाळांत ६३१ व उमरी तालुक्यात ५ शाळांत ५२ जागा प्रवेशित आहेत़ पालकांनी आॅनलाईन अर्ज मुदतीत करण्याचे आवाहन शिक्षणाधिकाºयांनी केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी