शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

नांदेडहून आता दिल्लीसाठी सुरू होणार आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:26 PM

८ जूनपासून शनिवारची नवीन फेरी सुरू होणार

ठळक मुद्देनांदेडमधील प्रवाशांना दिलासा सचखंड गुरुद्वारामुळे देशाच्या विविध भागातून भाविकांचा नांदेडकडे दर्शनासाठी ओढा

नांदेड : प्रवाशांची  मागणी लक्षात घेता नांदेडहूनदिल्लीसाठी १९ नोव्हेंबर २०१८ रोजी विमानसेवा सुरु करण्यात आली होती.  ही सेवा आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार अशी सुरु आहे. यातच प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन  नांदेडहून दिल्लीसाठी आणखी एक नवी फेरी दर शनिवारी सुरु करण्यात येणार आहे.  यामुळे दिल्लीसाठी आता नांदेडकरांना आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा मिळणार असल्याचे नांदेड येथील एअर इंडिया स्टेशनचे व्यवस्थापक गजेंद्र गुठे आणि अजय भोळे यांनी सांगितले.

सचखंड गुरुद्वारामुळे देशाच्या विविध भागातून भाविकांचा नांदेडकडे दर्शनासाठी ओढा असतो. या बरोबरच वाढत्या उद्योगामुळे हैदराबाद, अमृतसर, मुंबई, दिल्लीसह चंदीगडला जाणाऱ्या प्रवाशांची संंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळावरुन मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरु करण्याची शहरवासियांची मागणी होती. त्यातच आता नव्याने ८ जूनपासून नांदेड-दिल्ली-नांदेड अशी दर शनिवारसाठी नवी सेवा उपलब्ध होणार आहे. दर शनिवारी दिल्लीहून हे विमान दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटेल व नांदेड येथे सायंकाळी ५ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. पुन्हा नांदेडहून दिल्लीसाठी सदर विमान सायंकाळी ५.४५ वाजता निघेल आणि रात्री ६ वाजून ३५ मिनिटांनी दिल्ली येथे पोहोचेल. या प्रवासाचे सुरुवातीचे शुल्क हे ४ हजार ३०९ रुपये इतके असणार आहे. तर सदर विमानाची प्रवासी क्षमता १२२ इतकी असून या विमानात आठ बिझनेस क्लास तर ११४ इकॉनॉमिक क्लास उपलब्ध राहणार आहेत. 

विविध ठिकाणी विमानसेवाकेंद्र शासनाच्या उड्डान योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरुन विविध ठिकाणी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. टू-जेटकडून हैदराबाद-नांदेड-मुंबई आणि मुंबई-नांदेड-हैदराबाद अशी दररोज विमानसेवा सुरु आहे. च्एअर इंडियाची नांदेड-चंदीगड ही विमानसेवा सुरु आहे. चंदीगडसाठी आठवड्यातून मंगळवार आणि बुधवारी तर दिल्लीसाठी सोमवार आणि गुरुवारी, अमृतसरसाठी रविवार आणि शनिवार विमानसेवा आहे.

टॅग्स :Nandedनांदेडairplaneविमानdelhiदिल्लीSachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेडtourismपर्यटन