शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नांदेड - देगलूर बसला धनेगाव बायपासजवळ अपघात; दोघे गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:55 AM

नांदेडहून देगलूरला जाणारी  बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास 15 प्रवासी जखमी झाले.

नांदेड : नांदेडहून देगलूरला जाणारी  बस ट्रकच्या धडकेने उलटली. यामध्ये चालक, वाहक यांच्यासह जवळपास 15 प्रवासी जखमी झाले. ही घटना आज सकाळी धनेगाव चौकात घडली.

शनिवारी सकाळी देगलूर आगाराची बस क्रमांक एमएच 14 बीटी 1567 नांदेड येथून देगलूरकडे निघाली. दरम्यान धनेगाव बायपास मार्गे नांदेड शहरात येणाऱ्या  ट्रकने (एमएच-42 बी-9775 ) धनेगाव चौकात बसच्या डाव्या बाजूने जोराची धडक दिली. यात बस उलटली आणि जवळपास 15 प्रवासी आणि चालक, वाहक जखमी झाले आहेत.जखमींवर  नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी आहेत. बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत.

अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना बसबाहेर काढुन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी अविनाश कचरे, आगार व्यवस्थापक व्यवहारे, कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

टॅग्स :Accidentअपघातstate transportराज्य परीवहन महामंडळNandedनांदेड