शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Nanded Crime: भररस्त्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून; तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:03 IST

आधी पानटपरीवर खरेदी केली अन् मग अचानक तरुणावर तुटून पडले; भोसी बस स्थानकावर दिवसाढवळ्या खुनाचा थरार! नक्की काय घडलं?

भोकर (जि. नांदेड): तालुक्यातील भोसी येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोकर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील भोसी बस स्थानकाजवळ ही घटना घडली. आदिनाथ काशिनाथ डुब्बेवाड (रा. शेंबोली, ता. मुदखेड) असे मृत तरुणाचे नाव असून, या भीषण हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पानटपरीवर खरेदी केली अन् मग केला वारमिळालेल्या माहितीनुसार, आदिनाथ हा भोसी बस स्थानकाजवळील एका पानटपरीसमोर उभा होता. त्याचवेळी एका मोटारसायकलवरून तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात तरुण तिथे पोहोचले. आरोपींनी आधी पानटपरीवर काही वस्तूंची खरेदी केली, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. त्यानंतर अचानक त्यांनी आदिनाथवर हल्ला केला आणि त्याच्या छातीवर व बरगडीवर धारदार शस्त्राने सुमारे पाच वार केले. आदिनाथ रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपींनी तिथून पळ काढला.

उपचारादरम्यान पहाटे प्राणज्योत मालवलीगंभीर जखमी झालेल्या आदिनाथला तातडीने बारड येथील दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि रक्तस्राव जास्त झाल्याने बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे.

आरोपींचा शोध सुरू; तपासाची चक्रे फिरलीभररस्त्यात झालेल्या या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून हा प्रकार घडला की यामागे काही दुसरे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांचा माग काढला जात आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth brutally murdered in broad daylight; assailants on the run.

Web Summary : In Bhokar, a young man, Adinath Dubbewad, was fatally stabbed in broad daylight near a bus stand. Two masked assailants attacked him at a tea stall, inflicting multiple wounds. He died during treatment. Police are investigating the motive and searching for the suspects.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड