शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लोहा तालुक्यातील बोरगावात जमिनीच्या वादातून दोन गट भिडले; कुऱ्हाड, चाकू, पाईपने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:07 IST

बोरगाव येथे भररस्त्यात तुंबळ हाणामारी, दोन्ही बाजूचे सदस्य गंभीर जखमी, परस्परविरोधी गुन्हे दाखल

लोहा (जि. नांदेड): तालुक्यातील बोरगाव (आ.) येथे जमिनीच्या जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना ७ मार्च रोजी घडली. या सशस्त्र हल्ल्यात कुऱ्हाड, लोखंडी पाईप, रॉड आणि चाकूचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटांतील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी दिलेल्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली बाजू: रस्ता अडवून कुऱ्हाडीने वारपुंडलीकराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जमिनीच्या व्यवहाराचा राग मनात धरून विठ्ठल पाटील, नारायण पाटील, राहुल पाटील व साहेब पाटील यांनी त्यांचा रस्ता अडवला. "तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत आरोपींनी लोखंडी कुऱ्हाड आणि पाईपने डोक्यावर व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

दुसरी बाजू: चाकूने छातीवर वार करण्याचा प्रयत्नदुसऱ्या गटातील नारायण पाटील यांनीही प्रतिफिर्याद दिली आहे. ८ मार्च रोजी पुंडलीक पाटील, अजित पाटील, जयश्री पाटील व उद्धव पाटील यांनी जुन्या वादातून शिवीगाळ करत हल्ला केला. यावेळी एका आरोपीने चाकूने छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला असता, हात आडवा केल्याने नारायण पाटील गंभीर जखमी झाले. तसेच लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर प्रहार करण्यात आले.

पोलीस तपास सुरूया घटनेमुळे बोरगाव परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण होते. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Land Dispute in Borgaon Turns Violent: Two Groups Clash

Web Summary : A land dispute in Borgaon led to a violent clash between two groups using axes, knives, and pipes. Multiple injuries occurred, and police have registered cross-complaints. Investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड