शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

नांदेड स्वच्छतेचा आराखडा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 12:02 AM

ठेकेदाराकडून कचरा वेगवेगळा घेण्याची कोणतीही व्यवस्था नागरिकांनाच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकचरा विलगीकरणही होईनानागरिकांनाच मनपाने दिला कठोर कारवाईचा इशारा

नांदेड : शहरात दरमहा एक ते सव्वाकोटी खर्च करुन स्वच्छता केली जात आहे. मात्र ही स्वच्छता करताना कचऱ्या विलगीकरण केले जात नाही. ठेकेदाराकडून कचरा वेगवेगळा घेण्याची कोणतीही व्यवस्था नागरिकांनाच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.शहरात क्षेत्रिय कार्यालय १ ते ६ अंतर्गत घरोघरी घनकचरा संकलन करणे, वाहतूक करणे, रस्ते झाडणे, नाली काढणे, नाल्यातील काढलेला कचरा उचलणे व डंपींग ग्राऊंड येथे नेऊन टाकण्याचे आर अ‍ॅन्ड बी या ठेकेदारास देण्यात आले आहे. मात्र आजघडीला घरोघरी कचरा संकलित करण्याचे काम कोणत्याही प्रभागात होत नाही. रस्ते सफाई, नाले सफाईचे कामेही अशी-तशीच होत असून त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. मागील दोन महिन्यात शहरातील अस्वच्छतेमुळे डेंगू, टाईफाईड आदी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. यासाठी डास हा घटक मुख्यत: कारणीभूत आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात कचरा उचलण्यासाठी महापालिकेने रुटमॅप तयार करण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र हा रुटमॅप आजघडीला तरी केवळ कागदावरच दिसत आहे. प्रत्यक्षात कचरा उचलण्यासाठी कोणताही रुटमॅप नियमित आणि वेळेवर होत नाही. त्यातच घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याच्या अटीचे पालनही अद्याप ठेकेदाराकडून झाले नाही. एकूणच दरमहा एक ते सव्वा कोटी रुपये खर्चून होत असलेली स्वच्छता ही प्रत्यक्षात होत आहे की कागदावरच होत आहे याकडे लक्ष देण्यास मनपा अधिकारी मात्र कमी पडत आहेत.शहरात स्वच्छतेचा जागरही कागदावरचमहापालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारी मुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ शहर, सुंदर शहरचा नारा दिला आहे. प्रत्यक्षात शहर स्वच्छतेच्या दृष्टीने घराघरातून कचरा संकलन करणे आवश्यक आहे. स्वच्छता ठेकेदाराचीही ती मुख्य जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात घराघरातून कचरा नेला जात नाही. नागरिकांनी रस्त्यावर फेकलेला कचरा एकत्र केला जातो. त्यात विलगीकरणाचा कोणताच भाग नसल्याचे स्पष्ट आहे. शहरात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. हे चाळीस पथनाट्य नेमके कुठे झाले? हाही संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान