शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

नांदेड शहरात ५२ कोटींची कामे मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:15 PM

दलित वस्ती निधीत २०१८-१९ ते २०२०-२१ चे प्रस्ताव तयार

- अनुराग पोवळे

नांदेड : शहरात दलित वस्ती निधीअंतर्गत होणाऱ्या कामांना गेल्या तीन वर्षापासून अडथळेच येत असून आता आगामी वर्षात २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ चे तब्बल ५२ कोटी २८ लाखांची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्यातील सत्तांतरणामुळे जिल्ह्यातील राजकारणही बदलले आहे. परिणामी आता विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.

नांदेड-वाघाळा महापालिका हद्दीत दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या तीन वर्षांच्या कामांना जणू ग्रहणच लागले, अशी परिस्थिती होती. शासनस्तरावर निधी मिळण्यास झालेल्या विलंबानंतर येथे स्थानिक स्तरावरही दलित वस्ती कामांना मंजुरी मिळणे हे जिकिरीचे झाले होते. यामध्ये पालकमंत्र्यांचे आडमुठे धोरण कारणीभूत ठरले. परिणामी २०१६-१७, २०१७-१८ या वर्षाची कामे जवळपास रखडल्यातच जमा होती. त्यानंतर तोडगा काढून ही कामे सुरू केली. २०१८-१९ साठी नांदेड महापालिकेला १५ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामेही मंजूर झाले असून ती सुरू करण्यात आली आहेत. २०१८-१९ साठी २० कोटींच्या कामाचे नियोजन दलित वस्ती निधीतून करण्यात येत आहे. तर २०२०-२१ साठी १२ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून या कामाचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवले जाणार आहेत. जवळपास ५२ कोटी २८ लाख रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २०१८-१९ साठी १५ कोटी ६६ लाख रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नांदेडला अशोकराव चव्हाण यांच्या रुपाने मंत्रीपदही मिळाले आहे. आगामी काळात जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नांदेडकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत़ महापालिका हद्दीतील तसेच जिल्ह्यातील इतर रखडलेली कामेही मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ 

दलितवस्ती कामांना चौकशीचे ग्रहणमहापालिका हद्दीतील सर्वसाधारण सभेने सुचवलेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पालकमंत्र्यांनी दिले होते. विभागीय स्तरावर ही चौकशी करण्यात आली. रखडलेल्या कामाच्या विरोधात मनपा पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आगामी काळात ही सर्व कामे मार्गी लागतील, असे चित्र आहे.

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाfundsनिधीNandedनांदेड