नांदेड, किनवटमध्ये धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:36 IST2019-07-13T00:36:10+5:302019-07-13T00:36:43+5:30

शहरातील गाडीपुरा भागात चोरट्यांनी घर फोडून २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली़ याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला़

Nanded, brave stealth in the coastal | नांदेड, किनवटमध्ये धाडसी चोरी

नांदेड, किनवटमध्ये धाडसी चोरी

ठळक मुद्देलाखोंचा ऐवज चोरट्यांनी लांबविला

नांदेड : शहरातील गाडीपुरा भागात चोरट्यांनी घर फोडून २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली़ याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला़
अब्दुल नईम अब्दुल समद (रा़बडी दर्गा) हे ९ जुलै रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते़ याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी भिंतीवरून घरात उतरत कपाट फोडले़ कपाटातील रोख ८० हजार आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख १० हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी अब्दुल नईम यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ तर दुसऱ्या घटनेत किनवट शहरातील रामनगर येथे घर फोडून चोरट्यांनी ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला़ प्रदीप नारायण गंडावार हे पत्नीला आणण्यासाठी हैदराबाद येथे गेले होते़ चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे ४४ हजार रुपयांचे दागिने लांबविले़ या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

Web Title: Nanded, brave stealth in the coastal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.