शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमधील दुचाकी स्फोटाचे 'परभणी कनेक्शन' उघड, एटीएसकडून गोपनीय तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:54 IST

नांदेडमध्ये दुचाकी जळताना झाले छोटे स्फोट; फटाके होते की स्फोटक पदार्थ? फॉरेन्सिक टीम मैदानात

नांदेड : शनिवारी ईदच्या पवित्र दिवशी वाजेगाव बंधारा परिसरात दुचाकीला लागलेल्या आगीत एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, प्राथमिक तपासात या घटनेचे धागेदोरे परभणी जिल्ह्याशी जोडले जात आहेत. जळणारी दुचाकी आणि त्यातून होणारे छोटे-मोठे स्फोट यामुळे हे प्रकरण केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न होता का? या दृष्टीने ‘एटीएस’सह स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

शनिवारी सकाळी वाजेगाव बंधारा परिसरात एका दुचाकीला भीषण आग लागली. यावेळी जवळच असलेल्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव प्रार्थनेसाठी जमले होते. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की, दुचाकी जळत असतानाच त्यात अनेक छोटे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. धक्कादायक बाब म्हणजे, आगीने वेढलेला तरुण आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळण्याऐवजी पुन्हा पुन्हा पेटलेल्या दुचाकीच्या दिशेनेच जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. त्याच्या या विचित्र वर्तणुकीमुळे गूढ वाढले आहे.

परभणी कनेक्शन आणि पोलिसांची गोपनीयतापोलिसांनी मयताची ओळख पटविल्याची माहिती समोर येत असली तरी, त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. ही दुचाकी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाची असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृत तरुणही परभणीचाच असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावर काही संशयास्पद वस्तू आढळल्याने एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

फटाके की स्फोटक पदार्थ?दुचाकी जळत असताना झालेले स्फोट हे पेट्रोल टाकीचे होते की त्या तरुणाजवळ काही फटाके किंवा इतर स्फोटक पदार्थ होते, याचा शोध आता फॉरेन्सिक टीम घेत आहे. संवेदनशील वेळी घडलेल्या या घटनेमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Bike Blast: Parbhani Link Emerges, ATS Investigates Secretly

Web Summary : Nanded bike fire death linked to Parbhani. Explosions raise suspicion; ATS investigates potential sabotage. The victim's strange behavior adds mystery.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी