शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

धक्कादायक! पोलिसाच्या फोनवरून अटक आरोपीने केला फरार आरोपीस व्हिडीओ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:27 IST

आरोपीची व्हीआयपी बडदास्त ठेवणे भोवले, पोलिस अंमलदार निलंबित

नांदेड : गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीची व्हीआयपी बडदास्त ठेवणे पोलिस अंमलदारास चांगलेच महागात पडले आहे. अटक आरोपीस त्याच प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस चक्क व्हिडीओ कॉल करून बोलणे करून दिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अंमलदार जतीन व्यंकटी सोनकांबळे यास निलंबित केले आहे. 

नांदेड ग्रामीण ठाण्यात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी हत्यार बाळगून दहशत निर्माण केल्याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. पैकी, अटक असलेल्या एका आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली असून, त्यास वजिराबाद येथील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. १३ जूनला इतवारा ठाण्यात कार्यरत असलेले ठाणे अंमलदार जतीन व्यंकटी सोनकांबळे यांची नेमणूक सेंट्री म्हणून करण्यात आली होती. 

बंदोबस्तावर असताना आरोपीवर नजर ठेवण्याऐवजी पदाचा गैरवापर करून सोनकांबळे यांनी स्वत:च्या मोबाईलवर आरोपीने सांगितलेल्या व्यक्तीस व्हिडीओ कॉल करून दिला. विशेष म्हणजे सदर कॉल ज्याला केला तो व्यक्ती कुख्यात गुंड असून, या प्रकरणी पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जतीन सोनकांबळे याच्या निलंबनाचे आदेश मंजूर केले. या निर्णयामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

आरोपींना व्हीआयपी सेवाअटकेतील आरोपी व कारागृहातील वलंयांकीत कैद्यांची व्हीआयपी बडदास्त ठेवण्यात पोलिस दलातील काहीजण मदत करतात. बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड प्रकरणाने ही बाब नुकतीच पुन्हा एकदा अधोरेखीत झाली होती. ही बाब केवळ एका जिल्ह्यापूरती मर्यादीत नसुन प्रत्येक ठिकाणी कुणी ना कुणी मदतीसाठी पुढे येते. ही मदत का केली जाते हे सर्वश्रुत आहे.

अधिकाऱ्यांनाही असावा कायद्याचा धाककाही वर्षांपूर्वी खंडणीच्या माध्यमातून दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंडासाठी स्वतःला दबंग असल्याचे दाखवणारा एलसीबीतील पोलिस अधिकारीच वसुली करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करुन त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली होती. त्याउपरही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आरोपीला पाठबळ देण्याचे प्रकार सुरुच असून त्यांचा शोध घेवून कायद्याचा धाक निर्माण करणे काळाची गरज आहे.

चौकशीनंतर पुढील कार्यवाहीलॉकअप ड्युटीवर असताना मोबाईलवर आरोपीस बोलणे करुन दिल्याची गंभीर बाब समोर आल्यावर ठाणे अंमलदार जतीन सोनकांबळे यास निलंबीत केले आहे. त्याची चौकशी सुरु असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.- अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरPoliceपोलिस