नांदेडमध्ये मोर्निगवॉक करणाऱ्यास पिकअपने उडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 19:58 IST2019-01-11T19:58:36+5:302019-01-11T19:58:57+5:30
मॉर्निंगवॉकसाठी जात असताना पाठीमागुन गाडीने दिलेल्या धडकेत एकजण ठार

नांदेडमध्ये मोर्निगवॉक करणाऱ्यास पिकअपने उडवले
नांदेड : राज्य महामार्गाच्या कडेने मॉर्निंगवॉकसाठी जात असताना पाठीमागुन गाडीने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. हनमंत हायगले (४५ ) असे मृताचे नाव असून ते कासराळीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष होते.
हनमंत विठ्ठलराव हायगले हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे नरसी मार्गाकडे मॉर्निंगवॉकसाठी जात होते. कासराळी आणि पाचपिंपळी दरम्यान नरसीकडेच जाणाऱ्या पिकअप गाडीने (एमएच-२६-बीई २८६३) हायगले यांना पाठीमागुन जोराची धडक दिली .यात हायगले हे जागीच ठार झाले.