१० हजारांहून अधिक झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 08:09 PM2020-09-23T20:09:25+5:302020-09-23T20:09:55+5:30

नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी  आता १० हजार १८३ एवढी झाली आहे. रूग्ण बरे  होण्याचे प्रमाण नांदेड जिल्ह्यात  ७४ टक्के  असल्याचेही जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले.

More than 10,000 became corona free | १० हजारांहून अधिक झाले कोरोनामुक्त

१० हजारांहून अधिक झाले कोरोनामुक्त

Next

नांदेड : जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २०५ जणांनी बुधवार दि. २२ रोजी कोरोनावर यशस्वीपणे मात  केल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्त रूग्णांची आकडेवारी आता १० हजार १८३ एवढी झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण नांदेड जिल्ह्यात ७४ टक्के असल्याचेही जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले.

बुधवारी सायंकाळी कोरोना तपासणीचे १०२३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २४५ अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यातील ६६ बाधित आरटीपीसीआर तपासणीद्वारे निष्पन्न झाले. तर १७९ बाधित अ‍ॅन्टीजेन तपासणीद्वारे पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. आरटीपीसीआर तपासणीद्वारे आढळलेल्या बांधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ३३, कंधार १, माहूर १, हदगाव ३, भोकर १, बिलोली २, देगलूर १, नांदेड ग्रामीण २, मुखेड ३, नायगाव ९, लोहा २, परभणी १, वाशिम १, यवतमाळ २ तर हिंगोली जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे.

अ‍ॅन्टीजेन तपासणीद्वारे १७९ बाधित आढळले. यात नांदेड मनपा क्षेत्रातील ७२, हदगाव ४, धर्माबाद १६, किनवट ८, बिलोली ५, हिमायतनगर १. भोकर १, बिदर १, नांदेड ग्रामीण १६, मुदखेड ४, लोहा ५, मुखेड ३१, नायगाव १२, कंधार १ आणि उमरी येथे ४ जण बाधित आढळून आले.

सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ३ हजार ५७७ जण उपचार घेत असून त्यातील ४८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

मागील २४ तासांत आणखी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Web Title: More than 10,000 became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.