मध्यरात्री वाजत गाजत वरात काढणाऱ्या वऱ्हाडीं विरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 16:52 IST2019-03-13T16:52:44+5:302019-03-13T16:52:54+5:30

मध्यरात्री गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाने केली कारवाई

At midnight, police filed a complaint against the warhadi | मध्यरात्री वाजत गाजत वरात काढणाऱ्या वऱ्हाडीं विरुद्ध गुन्हा दाखल 

मध्यरात्री वाजत गाजत वरात काढणाऱ्या वऱ्हाडीं विरुद्ध गुन्हा दाखल 

धर्माबाद ( जि. नांदेड ) रात्रीचे लग्न, त्यानंतर उशिरापर्यंत चाललेल्या जेवणावळीमुळे वरात निघायला उशिर झाला. त्यातच बँडबाजाच्या तालावरील ठसकेबाज गाण्यांना मिळत असलेला वन्समोर यामुळे मध्यरात्र उलटून गेल्याचेही वऱ्हाडाच्या लक्षात आले नाही. याचा फटका मात्र वाजंत्र्यांना सोसावा लागला. मध्यरात्री गस्त घालत असलेल्या पोलीस पथकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल सुर्यकांत दासरे यांच्या फियादीवरून नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विजय नामदेव वासणीकर, प्रशांत सायबु भुमकर, सतिश पिराजी वासणीकर, नरेश गंगाधर चिखले, गंगाधर सय्याजी चिखले,    माधव लक्ष्मण सुर्यवंशी , शंकरं नामदेव वासणीकर, दयानंद विठ्ठलराव सोनकाबंळे ,श्रीकांत विठ्ठलराव सोनकाबंळे सर्व  रा बाळापुर  या नऊ  जणांचा समावेश आहे.अधिक तपास पोहेकॉ मनोज मसलेकर करित आहेत.

Web Title: At midnight, police filed a complaint against the warhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.