शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकारी व्हेंटिलेटरवर...

By admin | Updated: March 2, 2015 13:31 IST

आपत्कालीन वैद्यकीय सेवा १0८ चा राज्यभर बोलबाला होत असून एकट्या नांदेड जिल्ह्यात गत वर्षभरात या सेवेद्वारे २0 हजारांहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे.

नांदेड : आपत्कालीन वैद्यकीय सेवा १0८ चा राज्यभर बोलबाला होत असून एकट्या नांदेड जिल्ह्यात गत वर्षभरात या सेवेद्वारे २0 हजारांहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. तर राज्यात हा आकडा तब्बल दोन लाखांवर जातो. असे असताना या सेवेसाठी परिश्रम घेणार्‍या राज्यातील तीन हजारांवर वैद्यकीय अधिकार्‍यांना दहा हजारांचे नाममात्र वेतन देवून बोळवणूक करण्यात येत आहे.
शासनाने पीपीपी तत्वावर १0८ ही सेवा सुरु केली. या सेवेला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. कुठेही अपघात झाला की, १0८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला जात आहे. पंधरा मिनिटांच्या आत अपघातस्थळी सदरील रुग्णवाहिका दाखल होत असून त्याद्वारे अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्याचबरोबर अनेक गर्भवतींच्या प्रसूतीही या अँम्बुलन्समध्ये करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात तर ही सेवा जीवनदायिनी ठरत आहे. असे असताना ही सेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मागण्यांकडे मात्र बीव्हीजी ही कंपनी साफ दुर्लक्ष करीत आहे. वेतनवाढीचा मुद्दा उपस्थित केल्यास सेवेतून कमी करण्याचा दम भरला जात आहे. त्यामुळे रुग्णांना जीवनदान देणारे या सेवेतील वैद्यकीय अधिकारीच सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. याबाबत वैद्यकीय अधिकारी विभागीय व्यवस्थापक डॉ. गजानन पुराणिक यांच्यापुढेही गार्‍हाणे मांडले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. 
किमान २५ हजार रुपये वेतन, वैद्यकीय अधिकारी व पायलट यांचा २५ लाखांचा विमा, या सेवेचा प्रोटोकॉल, वेतनाची पावती आदी अनेक मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापासून हे वैद्यकीय अधिकारी झगडत आहेत. त्यामुळे या वैद्यकीय अधिकार्‍यांनी आता राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक झाली असून बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत मेरगेवाड, डॉ. चंद्रकांत थोटे, डॉ. विजय मसलगेकर, सुनील मंगनाळे, डॉ. धनंजय देवमाने, डॉ. पाईकराव, डॉ. जीवने, डॉ. उमरेकर, डॉ. सुनील जाधव, डॉ. नरवाडे, डॉ. भाटापूरकर, डॉ. पद्माकर पाटील, डॉ. मिरासे, डॉ. उमेश जाधव, डॉ. खानजोडे यांची उपस्थिती होती. /(प्रतिनिधी)
आपत्कालीन सेवेअंतर्गत राज्यभरात ९२६ अँम्बुलन्स आहेत. तर जिल्ह्यात २५ आहेत. प्रत्येकी ३ कर्मचारी याप्रमाणे ३000 डॉक्टर या सेवेसाठी कार्यरत आहेत. तर चालकांची संख्या १८00 एवढी आहे. त्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधीही येतो. परंतु प्रत्यक्ष कराराबाबत वैद्यकीय अधिकार्‍यांनाही अंधारात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वेतन किती असावे, याबाबत सर्व गोंधळ आहे.