शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी शमविण्याचे आव्हान; भोकरमध्ये सर्वाधिक १६७ उमेदवार, अपक्षांचा वाढता 'भाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:58 IST

भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया निवडणूक रिंगणात असल्याने अपक्ष उमेदवार चांगलाच भाव खात आहेत.

नांदेड : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या या निवडणुकीत वाढली आहे. परंतु, चार दिवसांत कोण कुणाच्या गळाला लागतो अन् उमेदवारी मागे घेतो याचा अंदाज बांधून ज्या त्या उमेदवारांचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. अंधाऱ्या रात्री बैठकांचे सत्र सुरू असून जातनिहाय, पक्षनिहाय अपक्षांचा भाव निघाला असून भोकर विधानसभा मतदार संघातील अपक्षांचा उमेदवारी मागे घेण्यासाठीचा 'आकडा' दिवसेंदिवस वाढतो आहे.

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक १६७ जणांनी भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली आहे. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांची कन्या श्रीजया निवडणूक रिंगणात असल्याने अपक्ष उमेदवार चांगलाच भाव खात आहेत. त्याचबरोबर लोहा आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार वरिष्ठ नेत्यांना आपल्यासाठीच सभा, बैठका घेण्याचा आग्रह धरत आहेत. त्याचबरोबर आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातील इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत स्वकियांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कशा पद्धतीने मागे घेता येईल, यासाठीचे गणित बांधले जात असून त्यासाठी बंडखोरांच्या गॉडफादरपर्यंत अधिकृत उमेदवार अन् त्यांचे निकटवर्तीय तन, मन, धनाने संपर्क साधत आहेत. अपक्षांपैकी कोण माघारी घेणार अन् कोण प्रत्यक्षात मैदानात राहणार? यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकbhokar-acभोकरnanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिणloha-acलोहा