शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

लग्नसराईला आचारसंहितेची आडकाठी; रोख रकमेबाबत खबरदारी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:43 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बिलोली : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे डोकेदुखी ठरु शकते. यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. बिलोलीपासून अवघ्या ९ किमी अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवर गस्ती पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आचारसंहितेनुसार १० हजारांहून अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता योग्य कागदपत्रे सादर केल्यास कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त करण्यात येणार आहे. तेलंगणा राज्यात लग्नसराईच्या खरेदीसाठी बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक नागरिक खरेदीसाठी जातात.लग्नासाठी सोने, कपडे, भांडी खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते. यावेळी आगामी दोन महिने अशी मोठी रक्कम बाळगताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. अधिक रक्कम असल्यास बँकेतून काढल्याची पावती अथवा एटीएम मधून घेतल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे. सामान्य लग्नाबाबत परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. परंतु लग्नाला राजकीय नेते उपस्थित राहणार असतील तर खबरदारी घ्यावी लागेल.ज्या ठिकाणी अधिक नागरिक जमा होतात, त्या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जेवणावेळी, पैशाचा वापर होण्याची शक्यता असते. यासाठी अधिकाºयांकडून खबरदारी घेण्यात येणार आहे.एप्रिल, मे महिन्यात १९ मुहूर्तएप्रिल व मे महिन्यात एकाचवेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि लग्नसराईची झुंबड उडणार आहे. दोन महिन्यांत १९ विवाहमुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये १७, १८, २२, २४, २६, २७ व २८ तर मे महिन्यात ७, ८, १२, १७, १९, २१, २३, २६, २९, ३०, ३१ रोजी विवाहमुहूर्त आहेत.खरेदीसाठी जाणा-यांना फटकाआचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवर नाके उभारले आहेत. याचा फटका प्रामुख्याने महाराष्ट्रातून परराज्यात ये- जा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात येणा-या-जाणा-या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. खरेदीसाठी सोबत घेतलेल्या पैशाबाबतची कागदपत्रे अधिका-यांना सादर करावी लागतील.

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नMONEYपैसा