मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:17 IST2021-03-06T04:17:33+5:302021-03-06T04:17:33+5:30
नांदेड - आस्था बालक आश्रमामधील अनाथ मुलींवरील अत्याचार प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच बाल कल्याण समिती ...

मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
नांदेड - आस्था बालक आश्रमामधील अनाथ मुलींवरील अत्याचार प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच बाल कल्याण समिती नांदेड यांना देखील जबाबदार धरून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी मुलींना ठेवण्याची मान्यता नसताना आणि मुलींसाठी कोणतीही सुरक्षितता नसताना या आश्रमात मुलींना कसे काय ठेवण्यात आले, असा प्रश्न भाकपा युनायटेडचे प्रा. सदाशिव भुयारे यांनी उपस्थित केला आहे. बहुजन शिक्षक महासंघाची कार्यकारिणी
नांदेड- महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी जगन ढवळे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीस- प्रदीप सोनकांबळे, कोषाध्यक्ष - आर. जी. वाघमारे, कार्याध्यक्ष- बारकाजी सोनकांबळे, उपाध्यक्ष- जी. एस.भालेराव, एन. आर. पारदे, विलास शिनगारपुतळे आदींची नियुक्ती केली.
दारूबंदी विषयक कायदे कडक करा
नांदेड- दारूबंदी विषयक कायदे अधिक कडक, मजबूत, सक्तीचे करावे, अशी मागणी अल इम्रान प्रतिष्ठानचे इंजि. इम्रान खान पठाण यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्याकडे एका निवदेनाद्वारे केली. यावेळी रिपाइंचे डॉ. सिद्धार्थ भालेराव, जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, जी. जी. गच्चे, उदय नरवाडे, अविनाश पाईकराव, मिलिंद सोनसळे, मिर्जा आजम बेग आदींची उपस्थिती होती.
मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
नांदेड- श्रीनिकेतन हायस्कूल, सहयोगनगर येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यशवंत थोरात हे होते. प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक कांचन सोनकांबळे यांनी केले. यावेळी संघर्ष भद्रे, मनस्वी रगडे, अंजली मुळे, प्रफुल्ल भवरे या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. सूत्रसंचालन निता जगधने यांनी तर उमाकांत व्हनशेट्टे यांनी आभार मानले.