Maratha Reservation : विधेयक संमत होताच नांदेडात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाजबांधवांकडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 16:05 IST2018-11-29T16:03:45+5:302018-11-29T16:05:51+5:30
महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांसह मराठा समाज बांधवांनी शहरात ठिकठिकाणी जल्लोष केला.

Maratha Reservation : विधेयक संमत होताच नांदेडात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाजबांधवांकडून जल्लोष
नांदेड : मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करून मराठा समाजाला आरक्षण देऊन महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांसह मराठा समाज बांधवांनी शहरात ठिकठिकाणी जल्लोष केला.
यावेळी साखर वाटप करून फटाके फोडण्यात आले. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर ,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, चैतन्यबापू देशमुख ,विनय सगर, दिलीप कंदकुर्ते, दिलीप सोडी, विजय गंभीरे, अरुंधती पुरंदरे, शीतल खांडील, भालके ,विरोधी पक्षनेत्या सोडी ,संदीप पावडे, दीपक पावडे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, काही तरुणांनी दुचाकी रॅली काढून शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. तसेच नांदेड उत्तर ग्रामिनच्या वतीने ढोल ताशे व फटाक्याच्या अतिशय बाजीत साखर वाटुन भाजपा तालुका संपर्क कार्यालयात उत्सव साजरा. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक पावडे, तालुका सरचिटणीस अनिल देशमुख व तालुका सरचिटनिस शंकर वानेगावकर तालुक्यातील प्रमुख नेते व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.