मध्य प्रदेशच्या मजुराची नांदेडमध्ये लॉजवर आत्महत्या
By शिवराज बिचेवार | Updated: April 17, 2023 18:56 IST2023-04-17T18:56:13+5:302023-04-17T18:56:27+5:30
गेल्या दोन वर्षांपासून तो नांदेडात होता. तो हॉटेल मधुर लॉज येथे स्लॅपच्या कामावर होता.

मध्य प्रदेशच्या मजुराची नांदेडमध्ये लॉजवर आत्महत्या
नांदेड : परप्रांतातील अनेक मजूर नांदेडात कामासाठी आहेत. त्यातच एका लॉजवर असलेल्या मध्य प्रदेशातील मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कुलचंद्र अभिलाला जारिया रा. धुखोडा लागणा, मध्य प्रदेश असे मयत मजुराचे नाव आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तो नांदेडात होता. तो हॉटेल मधुर लॉज येथे स्लॅपच्या कामावर होता. परंतु रविवारी कामावर आला नव्हता. त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील हुकाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारची सुट्टी असल्यामुळे कुणालाही उशिरापर्यंत ही बाब लक्षात आली. त्यानंतर सायंकाळी घटना उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. या मजुराच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र पुढे आले नाही.