शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

भिजलेला गहू स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:27 AM

गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.

ठळक मुद्दे‘खापरा’चेही प्रमाण केंद्रीय वखारमधून तालुकास्तरीय गोदामाकडे गव्हाची वाहतूक

नांदेड : गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानासाठी प्रतिमाह जवळपास ८ हजार मेट्रीक टन गहू आवश्यक आहे. आवश्यक असलेला हा गहू प्राप्त झाला असून १५, १६, १७ जून रोजी हा गहू तुप्पा येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला आहे. विशेष पॉलीश नसलेला गहू आणि १६ टक्क्याहून अधिक आर्द्रता असलेला हा गहू लाभार्थ्यांना वाटप केला जाणार आहे.कृष्णूर धान्य घोटाळ्यापासून संपूर्ण स्वस्त धान्य वितरीत करणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या प्रकरणात आता अधिकारीही रडारवर आले आहेत. स्वस्त धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदारही आज तुरुंगात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारे धान्य चांगल्या प्रतिचे आहे की नाही? याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहेत.पंजाबहून आलेला हा गहू उघड्यावरील असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर गहू भारतीय खाद्यान्न महामंडळामार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आला आहे. हा गहू आता तालुकास्तरावरील शासकीय गोदामात पोहचविला जात आहे. त्यानंतर तो स्वस्त धान्य दुकानात आणि पुढे तो लाभार्थ्यांना वितरीत केला जातो.गव्हाची साधारण आर्द्रता ११ टक्के असावी. मात्र केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आलेल्या गव्हामध्ये १६ ते १७ टक्याहून अधिक आर्द्रता आहे. या गव्हाला पॉलीशही नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी गव्हाचे काही वेळातच पिठ करणाºया खापरा किडीचे प्रमाणही अधिक दिसत आहे.विशेष म्हणजे हा गहू केंद्रीय वखार महामंडळाने स्विकारला असल्याचे त्याचे वितरणही सुरू झाले आहे. गव्हाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरीत करण्यासाठी आलला तांदूळही रिसायकल प्रक्रियेतून आला आहे. यासाठी वापरण्यात आलेले बारदानेही जुनेच आहेत. तांदळातील तुकडीचे प्रमाण २९ टक्के ग्राह्य असते. पण जवळपास ४५ टक्के तुकडीचे असलेला तांदुळ केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून वितरीत होत आहे.

केंद्रीय वखार महामंडळात प्राप्त झालेला हा गहू पंजाब येथून आलेला आहे. सदर गव्हाचा दर्जा चांगला आहे. हा गहू तालुकास्तरावर आता वितरीत केला जाणार आहे. भारतीय खाद्यान्न महामंडळाकडून चांगला गहू आला आहे.- सी.के.दत्ताव्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीSocialसामाजिक