शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

lok sabha election 2019 : काँग्रेससह भाजपामधूनही उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:29 IST

काँग्रेसच्या रणनीतीमुळे भाजपानेही सबुरीची रणनीती आखली आहे.

- विशाल सोनटक्के 

नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेससहभाजपाचाही उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उमेदवाराविनाच प्रचार सुरु केला असला तरी उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. १९७७ मध्ये शेकाप आणि त्यानंतर एकदा भाजपा अशा दोन निवडणुका सोडल्या तर सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. मागील निवडणुकीत भाजपाची मोदी लाट असतानाही नांदेड लोकसभेतून अशोकराव चव्हाण हे सुमारे ८२ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा निवडणूक प्रचाराला लागले आहेत. खा. अशोकराव चव्हाण यांनी लोकसभेऐवजी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून लोकसभेसाठी आ. अमिता चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे. तसा प्रस्तावही जिल्हा काँग्रेसने पक्षश्रेष्ठीकडे सादर केला आहे. मात्र ऐन वेळी खा. चव्हाण हेच काँग्रेसकडून उमेदवार ठरण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या रणनीतीमुळे भाजपानेही सबुरीची रणनीती आखली आहे. भाजपाकडून लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र आ. अमिता चव्हाण निवडणूक रिंगणात उतरल्यास भाजपाकडून जिल्हा परिषद सदस्या मीनल खतगावकर यांना मैदानात आणले जाऊ शकते.  

प्रमुख पक्षांच्या प्रचाराला वेगकाँग्रेसकडून अशोक चव्हाण की अमिता चव्हाण आणि भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकर की अन्य कोणी, असा प्रश्न असला तरी या दोन्ही पक्षांनी उमेदवारी  जाहीर होण्याची वाट न पाहता प्रचाराला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही  वाड्या, वस्त्यांवर मतदारांच्या गाठी-भेटी सुरू केल्या आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा