शेताकडे निघालेल्या मायलेकीवर वीज कोसळली; मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 15:15 IST2022-07-09T15:15:15+5:302022-07-09T15:15:42+5:30
तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

शेताकडे निघालेल्या मायलेकीवर वीज कोसळली; मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी
भोकर (नांदेड) : तालुक्यातील भुरभुसी येथे वीज अंगावर कोसळून १४ वर्षीय आडेला नारायण गमेवाड या मुलीचा मृत्यू झाला. तिची आली चंद्रकलाबाई नारायण गमेवाड (दोघे रा. भुरभुसी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी महिलेवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास पावसाने थोडी विश्रांती घेतली. यामुळे भुरभुसी येथील चंद्रकलाबाई नारायण गमेवाड आपली मुलगी आडेलासह जनावरे चारण्यासाठी शेताकडे निघाल्या.
दरम्यान, अचानक वीज कोसळून आडेलाचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकलाबाई गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाल्या. जखमी चंद्रकलाबाई यांच्यावर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.