फडणवीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतात; संजय राऊत यांचा पलटवार

By शिवराज बिचेवार | Updated: May 19, 2023 10:10 IST2023-05-19T10:09:39+5:302023-05-19T10:10:20+5:30

महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालणार अस वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलं होत

Let Devendra Fadnavis speak, his words increase our seats; Sanjay Raut's counter attack | फडणवीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतात; संजय राऊत यांचा पलटवार

फडणवीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतात; संजय राऊत यांचा पलटवार

नांदेड: महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालणार अस वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलं होतं, त्यांच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. फडवणीसांना बोलू द्या त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतात. आगामी काळात महाराष्ट्रात देखील सत्तापरिवर्तन होईल असा दावा राऊत यांनी केला. राऊत हे गुरुवारी रात्री नांदेड जिल्ह्यात आले होते. 

उद्धव ठाकरे गटांने सुप्रीम कोर्टात आठ मागण्या केल्या पण कोर्टाने त्यातील एकही मागणी मान्य केली नाही असं वक्तव्य देवेंद्र फडवणीस यांनी केलं त्यावर प्रति उत्तर देताना संजय राऊत यांनी अस बोलणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान करण्यासारखं असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदे- फडणवीस यांचा पोपट मेला आहे असेही राऊत म्हणाले. आगामी निवडणुकीत आमदार बालाजी कल्याणकर आणि खासदार हेमंत पाटील हे दोघेही दिसणार नाहीत, असेही राऊत म्हणाले

Web Title: Let Devendra Fadnavis speak, his words increase our seats; Sanjay Raut's counter attack