नांदेड : दिल्ली येथे कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड येथे शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीकडून किसान बाग आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. परंतु, केंद्र सरकार मागे हटायला तयार नाही. शेतकरी आंदोलनाला अनेक संघटनांकडून पाठिंबा दिला जात आहे. नांदेडमध्येही वंचित बहुजन आघाडीने किसान बाग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यापूर्वी वंचितकडून १७ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी हातात ‘जय जवान जय किसान, कृषी कायदे रद्द करा’, असे फलक घेत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
किसान बाग आंदोलनाने परिसर दणाणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST