किनवट रोडवर भरधाव ट्रकने मोपेडस्वार जेष्ठ नागरिकास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 17:38 IST2021-11-04T17:37:37+5:302021-11-04T17:38:15+5:30
सेवानिवृत्त आरोग्य पर्यवेक्षक मोपेडवरून किनवटकडे जात होते

किनवट रोडवर भरधाव ट्रकने मोपेडस्वार जेष्ठ नागरिकास चिरडले
किनवट : किनवट-नांदेड मार्गावर गोकुंदा येथे एका भरधाव ट्रकने मोपेडस्वारास चिरडल्याची घटना आज दुपारी तीन वाजे दरम्यान घडली. माणिकराव पोचिराम कुमरे ( ६०) असे मृताचे नाव आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मलेरिया आरोग्य पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले माणिकराव कुमरे गोकुंदा येथे राहतात. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोपेडवरून ( क्रं एम एच २६ ए डब्ल्यू ९१९९ ) ते किनवटला जात होते. दरम्यान, किनवटकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रं एम एच २२ एन १९१३ ) मार्गावरील एका हॉटेलसमोर त्यांना चिरडले. यात माणिकराव कुमरे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वाठोरे, पोलिस उपनिरीक्षक घुले, पोलिस नायक सुनिल कोलबुद्धे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामाकरून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.