शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

जांबकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:40 AM

मुखेड-शिरुर रोडवर व-हाडाला झालेल्या भीषण अपघाताने जांबवासियांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शक्य त्याप्रकारे अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना मदत केली़ जांबकरांनी दाखविलेल्या या तत्परतेने माणुसकीचे दर्शन घडविले़

ठळक मुद्देअपघातातील मदतीसाठी धाव : मिळेल त्या वाहनाने जखमींना पाठविले रुग्णालयात

विजय पांपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कजांब : मुखेड-शिरुर रोडवर व-हाडाला झालेल्या भीषण अपघाताने जांबवासियांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती़ अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शक्य त्याप्रकारे अपघातस्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना मदत केली़ जांबकरांनी दाखविलेल्या या तत्परतेने माणुसकीचे दर्शन घडविले़जांबवासियांना शनिवार हा दिवस अत्यंत कसोटीचा ठरला. एकीकडे प्रेताचा खच तर दुसरीकडे जखमींचा आक्रोश पाहून हृदय हेलावून जात होते. किंकाळ्या व रडण्याने हा परिसर शोकाकूल झाला होता. जखमींना उपचारासाठी दाखल करण्याची प्रक्रिया जलदगतीने करणे आवश्यक होते. जखमींची संख्या २८ च्यावर असल्याने या सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यासाठी जांबवासियांनी तत्परता दाखविली. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलाविण्यात आल्या. त्यानंतर रुग्णांना जवळच्या रुग्णालयात तसेच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जे वाहन दिसेल त्या वाहनांनी हलविण्यात आले. यावेळी जांब येथील सूर्यकांत मोरे, मनोज गोंड, बाळासाहेब पुंडे, अण्णाराव शिंदे, श्रीकांत सूर्यवंशी, सोमनाथ फुलारी, आनंद राऊतवाड, माधव वारे, ओमकार सोनटक्के, रमेश कटाळे, संतोष कटाळे, गजानन शिंदे, युसूफ मुजावर, श्याम शिंदे, संजय येरपूरवाड, दयानंद कानगुले, शेषराव मोरे, बालाजी कोल्हे आदींनी मदतकार्यात भाग घेतला. जखमींना पाणी पाजणे तसेच त्यांना धीर देण्याचे काम जांबवासिय करीत होते. द्वारकाबाई मोरे यांनी मयताच्या अंगावर स्वत:जवळील वस्त्र पांघरले. जांब येथील सपोनि गणपत गिते अपघात झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते़जांबच्या डॉक्टरांनी केले प्राथमिक उपचारघटनास्थळी अपघाताची भीषणता लक्षात घेऊन जांब येथील ग्रामस्थांनी जमेल तसे जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात दिला़ जि.प.सदस्य मनोज गोंड आणाराव शिंद, बाळासाहेब पुंडे, उपसरपंच बालाजी कोल्हे, दयानंद कानगुले, सोमनाथ राऊत, शिवलिंग कानगुले, श्याम शिंदे, सूर्यकांत मोरे, अनंत राऊतवाड, वैभव कानगुले, आदींसह गावकरी मंडळीनी जखमींना मदत केली़ तर ग्रामपंचायतच्या वतीने दवाखान्यात अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती़ घटनास्थळी व दवाखान्यात आ़ तुषार राठोड व देगलूर मतदारसंघाचे आ़ सुभाष साबणे, दिलीप पाटील, संतोष तिडके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपअधीक्षक किशोर कांबळे, उपजिल्हाधिकारी व्यंकट कोळी, तहसीलदार जटाळे, मंडळ अधिकारी उत्तरवार, तलाठी जी.डी.कल्याणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विठ्ठल मेकाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ रमेश गवाले आदींनी भेट दिली़ गावातील डॉ़ तानाजी मोरे, डॉ़ संजय कोंडापुरे, डॉ़ अनंतवार डॉक़ापसे, डॉ़हासनाळे यांनी सावरगाव, वांजरवाडा, जळकोट येथील रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींवर प्राथमिक उपचार केले़ मुखेडचे पोनि़संजय चौबे, सुदर्शन सुर्वे, गणपतराव गीत्ते, गणपत केंद्रे, बळीराम घुले यांच्यासह घटनास्थळी मोठा फौजफाटा होता़

टॅग्स :Nandedनांदेडroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात