बलात्कारातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:43 IST2019-03-02T00:43:28+5:302019-03-02T00:43:58+5:30

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़

Jailed to rape case accused | बलात्कारातील आरोपी जेरबंद

बलात्कारातील आरोपी जेरबंद

ठळक मुद्देस्थागुशाची कामगिरी : ग्रामीण पोलिसांच्या दिले ताब्यात

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़
सपोनि विनोद दिघोरे, सपोउपनि जसवंतसिंह शाहू, , वडजे, दारासिंग राठोड, कागणे, पांगरेकर, बालाजी सातपुते हे शुक्रवारी पेट्रालिंग करीत होते़ यावेळी त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यातील दोन आरोपी हे मारतळा परिसरात फिरत असल्याचे त्यांना खबऱ्याकडून समजले़ त्यानंतर सपोनि विनोद दिघोरे यांच्या पथकाने मारतळा परिसरात रिक्षाथांब्याजवळ सापळा रचला़ यावेळी तेथे थांबलेल्या दोघांना पकडण्यात आले़
यावेळी त्यांची विचारपूस केली असता शिवाजी हनमल्लू गोस्कुलवाड (वय २३, रा फ़ुलेनगर, धर्माबाद) व प्रकाश साहेबराव लांडगे (२१, रा़ सिंगणापूर ता़ उमरी) अशी त्यांनी नावे सांगितली़ हे दोन्ही आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांना बलात्काराच्या गुन्ह्यात हवे होते़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही जण फरार होते़ फरार झाल्यापासून हे आरोपी उमरी आणि धर्माबाद परिसरात लपून राहत होते़ या दोन्ही आरोपींना स्थागुशाच्या पथकाने पुढील कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोनि़सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़

Web Title: Jailed to rape case accused