'...साधणार माणसाची गाडी नाही', वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास चालकाची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 18:46 IST2021-11-26T18:45:11+5:302021-11-26T18:46:06+5:30
गाडी काय साधारण माणसाची आहे का ? अशी अरेरावी करत पोलीस कर्मचाऱ्यास केली मारहाण

'...साधणार माणसाची गाडी नाही', वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास चालकाची मारहाण
हदगाव ( नांदेड ) : वाहतूक सुरळीत करत असताना एका कार चालकाने, ही गाडी काय साधारण माणसाची आहे का ? असे बोलत पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घातली. ऐवढ्यावरच न थांबता त्या चालकाने पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची संतापजनक घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान हदगाव येथील तामसा टी-पॉईंटवर घडली. बालाजी कवाने ( रा. अयोध्या नगर, हदगाव ) असे आरोपी चालकाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
तामसा टी-पॉईंटवर येथे वाहतूक खोळंबा झाल्याचे लक्षात येताच पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन पंडितराव चिंचोलकर तेथे पोहचले. यावेळी त्यांनी एका चालकास कार बाजूला घेण्यास सांगितले. यावर चालक बालाजी कवाने याने, गाडी काय साधारण माणसाची आहे का ? अशी अरेरावी करत पोलीस कर्मचारी सुदर्शन चिंचोलकर यांना मारहाण केली. या धक्कादायक प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने हदगाव पोलीस स्टेशनमध्ये चालक बालाजी कवाने याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पांढरे करत आहेत. कर्तव्य बजावताना अशा प्रकारे दबाव निर्माण करण्यात येत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये याबद्दल तीव्र रोष आहे.