लोह्यात क्षुल्लक कारणातून आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 19:24 IST2018-10-11T19:23:28+5:302018-10-11T19:24:14+5:30
कुटुंबात झालेल्या छुलक वादातून एका सतरा वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोह्यात क्षुल्लक कारणातून आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
लोहा (नांदेड ) : कुटुंबात झालेल्या छुलक वादातून एका सतरा वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील रामाचीवाडी येथे आज सकाळी ९ वाजता घडली.
संतोष रामाराव केंद्र असे मृत मुलाचे नाव आहे. लोह्यातील शासकिय औद्योगिक तंत्रशिक्षण महाविद्यालयात यांत्रिकी डिझेल अभ्यासक्रमाच्या पहिला वर्षात तो शिक्षण घेत असे. शेतातील काम करत असताना त्याचे कुटुंबासोबत छुलक कारणावरून वाद झाला होता. यातूनच त्याने आज सकाळी शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.