शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कुंडलवाडीत तीन शालेय विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:21 IST

३० आॅक्टोबरच्या रात्री येथील इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दोन आरोपींनी बेदम मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या़

कुंडलवाडी : ३० आॅक्टोबरच्या रात्री येथील इयत्ता १० वी व १२ वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना दोन आरोपींनी बेदम मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवून बेड्या ठोकल्या़कुंडलेश्वर मंदिर परिसरातील अजय पी़ इरन्ना उन्हाळे (वय १४), शुभम कोंडलिंग स्वामी, संतोष मोहन शिरामे (सर्व रा़ कुंडलवाडी) या शालेय विद्यार्थ्यांना ३० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजता आरोपी सुनील शिवराम कोटलावार याने ‘तुम्ही तिघे अनिल इटलावार याच्यासोबत का फिरता’ असे विचारत येथील के़रामलू मंगल कार्यालयात जबरदस्तीने मोटारसायकलवर (क्ऱ एम़एच़२६-ए़वाय़९१०२) बसवून घेवून आला़ तेथे अगोदरच नागेश दिगांबर तडकासाट हा होता़मंगल कार्यालयातील एका खोलीत बंद करून या तिन्ही विद्यार्थ्यांना चामडी पट्ट्याने मारहाण केली व नागेश तडकासाट याने बांबूने मारहाण करून गंभीर जखमी केले़ फिर्यादी अजय उन्हाळे, शुभम स्वामी व संतोष शिरामे यांच्या शरीराच्या संपूर्ण भागावर बांबू व चामडी पट्ट्याचे व्रण पाहून त्यांचे माता-पिता, नातेवाईक, शेजारी यांनी संताप व्यक्त केला़ आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने या मारहाणीत विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले़सदर घटना डीवायएसपी नुरुल हसन यांना कळताच त्यांनी तत्काळ कुंडलवाडीस येऊन गंभीर मारहाणीने दुखापत झालेल्या तिन्ही शालेय विद्यार्थ्यांची झालेल्या प्रकाराबद्दल विचारपूस करून वैद्यकीय तपासणी अहवाल पाहता दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या़ उपविभागीय पोलीस अधिका-यांनी झालेल्या गंभीर प्रकाराची स्वत: दखल घेत तपास स्वत:कडे घेतल्याने स्थानिक पोलिसांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़ के़रामलू मंगल कार्यालय नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिले असून त्याची रात्रीच्या वेळी चावी आरोपीकडे कशी काय देण्यात आली? अनिल इटलावार याचा या घटनेशी काय संबंध ? घटनेपूर्वी आरोपी स्थानिक एकाच्या घरात दोनदा नेमके कशासाठी गेले? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे़प्रकरणात काही अनुत्तरीत प्रश्न

  • के़रामलू मंगल कार्यालय नगरपालिकेने भाडेतत्त्वावर दिले असून त्याची रात्रीच्या वेळी चावी आरोपीकडे कशी काय देण्यात आली ?
  • अनिल इटलावार याचा या घटनेशी काय संबंध ?
  • घटनेपूर्वी आरोपी स्थानिक एकाच्या घरात दोनवेळा नेमके कशासाठी गेले हे प्रश्न मात्र अनुत्तरीत आहेत़

 

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी