शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्यामुळे शाळा नावारुपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:30 IST

तालुक्याच्या एका टोकाला असलेली शिराढोण ता. कंधार येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत ज्ञानरचनावादासह नवनवीन उपक्रम राबवत मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रयोगशीलतेने शाळा नावारूपाला आणली आहे.

ठळक मुद्देडिजिटल, स्वयंअध्ययन, शैक्षणिक साहित्यांचा वापरशिष्यवृत्तीधारकांसाठी वेगळे वर्ग

गंगाधर तोगरे।कंधार : तालुक्याच्या एका टोकाला असलेली शिराढोण ता. कंधार येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत ज्ञानरचनावादासह नवनवीन उपक्रम राबवत मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रयोगशीलतेने शाळा नावारूपाला आणली आहे. आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिल्याने ही शाळा चर्चेत आली आहे.शिराढोण हे गाव मोठ्या लोकवस्तीचे आहे. गावात विविध धर्म व जातीचे नागरिक एकोप्याने राहून विकासाकडे वाटचाल करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचा व प्रमुख घटक मानत आले. जि. प. केंद्रीय प्रा. शाळेची स्थापना १९५७ साली झाली. शाळा प्रारंभापासूनच गावकऱ्यांनी शिक्षणातील बदलत्या संकल्पनेला अंगीकारून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले. त्यामुळे शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत नवनवीन उपक्रम राबवायला हुरूप आला. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शाळा गुणवत्तावाढीत झेप घेण्यासाठी सरसावली आहे.शाळेची टोलेजंग इमारत लक्षवेधी आहे. सध्या १२ वर्गखोल्या व १२ शिक्षकी शाळेत पायाभूत व भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात असल्याने चिमुकले शिक्षणाचे धडे गिरवताना रममाण होतात. असा रमणीय परिसर आहे. ७ शिक्षिका व ५ शिक्षकांनी शाळेला नवा आयाम देण्याचा ध्यास घेतला आहे.डिजिटल, ज्ञानरचनावादी, स्वयंअध्ययन पद्धत, शैक्षणिक साहित्याचा वापर, शिष्यवृत्तीधारक वाढविण्यासाठी वेगळे वर्ग, दिनविशेष, फलकलेखन, रद्दीतून संदर्भ साहित्य निर्मिती, सामान्यज्ञानावर आधारित प्रश्रमंजुषा, तीन भाषेत परिपाठ, कलात्मक कागदी कात्रण, आनंददायी निसर्ग सहल, प्रार्थनेला नवनवीन पुस्तकांचे वाचन, बोलक्या भिंती, अभिवाचन उपक्रम, परिसर स्वच्छता, व्यसनमुक्ती आदी वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग राबवत भावी पिढी सक्षम, गुणवान करण्यासाठी, विद्यार्थिकेंद्रित करण्यासाठी शाळेने पुढाकार घेत शाळा नावारूपाला आणण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.शाळेने प्रारंभापासून विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यावर भर दिला. त्यामुळे शाळेतून कला, साहित्य, क्रीडा, उद्योग, प्रशासन आदी विविध क्षेत्राला सक्षम मनुष्यबळ पुरवण्यात योगदान देत आले आहे. इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या या शाळेत ३४० विद्यार्थीसंख्या आहे. त्यात १७६ मुले व १६४ मुलींची संख्या आहे. सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाजगी शासनमान्य शाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे कल वाढला असताना या शाळेच्या विविध प्रयोगशील उपक्रमांनी शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी पालकाचा कल दिसतो. कारण, शाळेतच विद्यार्थ्यांना नवे तंत्रज्ञान, नवे उपक्रमशील धडे मिळत असल्याने ही फलश्रुती असावी.सी. डी. मठपती या शिक्षकाने एप्रिल महिन्यात प्रशिक्षण घेतले आहे. सामान्य विज्ञानातील संपूर्ण संकल्पना व संबोध स्पष्ट करण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. विज्ञान केंद्राचा उपयोग विद्यार्थ्यांत विज्ञान विषयाची गोडी निर्माण करुन आनंद, मनोरंजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.उन्हाळ्यात पोषण आहार व मनोरंजनवर्गदुष्काळी भाग असल्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी उन्हाळ्यात दीड महिना पोषण आहार व मनोरंजनवर्ग घेण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते. शिष्यवृती परीक्षेत पात्र होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांकडून प्रयत्न केले जातात.

नानाविध उपक्रम, संकल्पना राबवून विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण करणारे शिक्षकवृंद शाळेला लाभले आहेत.विद्यार्थ्यांच्या आवडी व कलानुसार आनंददायी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक परिश्रमपूर्वक आपले योगदान देतात.- छाया बोरलेपवार, मुख्याध्यापक

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणSchoolशाळाtechnologyतंत्रज्ञान