अर्जापूर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:40 IST2018-05-25T00:40:38+5:302018-05-25T00:40:38+5:30

शासनाच्या जलस्वराज्य-२ अंतर्गत अर्जापूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे़ जागतिक बँकेकडून पाच कोटी अर्थसहाय्य मिळालेल्या योजनेची मुख्य जलवाहिनी जमिनीतून टाकण्यात आली. येत्या १५ दिवसात मांजरा नदीतील पाणी उपसाद्वारे चाचणी घेतली जाणार आहे़ दिवाळीपूर्व अर्जापूरकरांना शुद्ध पाणीपुरवठा होईल, अशी माहिती उपसरपंच लालू शेट्टीवार यांनी दिली़

Inadequate work on the Ardhpur water supply scheme | अर्जापूर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर

अर्जापूर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर

ठळक मुद्देमुख्य जलवाहिनीचे ८ किलोमीटरचे काम पूर्ण, १५ दिवसात उपसा चाचणी

राजेश गंगमवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : शासनाच्या जलस्वराज्य-२ अंतर्गत अर्जापूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे़ जागतिक बँकेकडून पाच कोटी अर्थसहाय्य मिळालेल्या योजनेची मुख्य जलवाहिनी जमिनीतून टाकण्यात आली. येत्या १५ दिवसात मांजरा नदीतील पाणी उपसाद्वारे चाचणी घेतली जाणार आहे़ दिवाळीपूर्व अर्जापूरकरांना शुद्ध पाणीपुरवठा होईल, अशी माहिती उपसरपंच लालू शेट्टीवार यांनी दिली़
आरळी जि़प़ सर्कलमध्ये मोडणाऱ्या अर्जापूर या गावासाठी जलस्वराज्य प्रकल्प-२ ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ सगरोळी पाठोपाठ अर्जापूर या योजनेचा शुभारंभ जानेवारीत झाला़ मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केल्यानंतर जागतिक बँकेच्या पथकाने अर्जापूरची पाहणी केली़ माचनूरच्या मांजरा नदी पात्रातून मुख्य जलवाहिनी जवळपास पूर्ण झाली आहे़ गावात पाण्याच्या टाकीचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे़
हुग़ोविंदराव पानसरे यांच्या पवित्र भूमीत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रभावी पाणीपुरवठा योजना होत असल्याने गावकºयांत समाधान व्यक्त होत आहे़ पावसाळापूर्व माचनूर ते अर्जापूर आठ कि़मी़ जलवाहिनीद्वारे होणारी पाईपलाईन टाकण्यात आली़ भूमीगत विहीर मांजरात पूर्णत्वाकडे आहे़ जीवन प्राधीकरण विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू असून दिवाळीपूर्व सोय होईल असे नियोजन असल्याचे सांगण्यात येते़ पाणी वितरण व्यवस्था संगणकीय पद्धतीने असून ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच रिमोट कंट्रोलद्वारे माचनूर स्थित पंपहाऊसमधील मोटारीचे नियंत्रण होईल़ नळधारकांना मीटर रिडींगनुसार पाणी व्यवस्थापन असून तालुक्यात पहिल्यांदाच नळांना मीटर राहणार आहे़

Web Title: Inadequate work on the Ardhpur water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.