चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातून पाच लाखांची बॅग केली लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2022 16:04 IST2022-09-09T15:59:56+5:302022-09-09T16:04:35+5:30

नांदेड जिल्ह्यात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातून पाच लाखांची बॅगेची चोरी केली आहे. 

In Nanded district, thieves have stolen a bag worth five lakhs from a house by showing fear of knife | चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातून पाच लाखांची बॅग केली लंपास

चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातून पाच लाखांची बॅग केली लंपास

 लक्ष्मण तुरेराव

नांदेड (धर्माबाद) : दिवसभर झालेल्या विक्रीचा हिशोब करुन बॅगेत पैसा भरून दुकान बंद करून घरी आले असता, पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातून पाच लाखांची बॅग पळविल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री १०- ४५ वाजता धर्माबादेत घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. 

 व्यंकटेश गौड काशा गौड यांचे धर्माबाद शहरातील बाळपुरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एकमेव एलोरा वॉईन शॉपचे दुकान आहे .या दुकानात देशी विदेशी दारूची  विक्री होते. ९ सप्टेबंर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने दारूची दुकाने बंद असतात म्हणून मोठ्या प्रमाणात गुरुवारी दारू ची खरेदी झाली. नेहमीप्रमाणे व्यंकटेश गौड यांनी गुरुवारी रात्री १०-३० वाजता दिवसभर झालेल्या दारू विक्रीचा हिशोब करुन गल्ल्यातील पूर्ण पैसा दुकान बंद करून सोबत नेताना सोबत पैशाची बॅग देखील घरी नेली. पैशाची बॅग आई असलेल्या खोलीतील पलंगावर ठेवून व्यंकटेश गौड हे फ्रेश होण्यासाठी गेले. यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने घरात घुसून व्यंकटेश गौड यांच्या पैशाची बॅग पळवली आहे घराला बाहेरुन कडी लावली. तितक्यात व्यंकटेश गौड यांच्या आईने चोरट्याला आडवले असता चोरट्याने आईवर चाकूचा धाक दाखवून आईला ढकलून पाच लाखांची बॅग घेऊन चोरटा पसार झाला. या घटनेमुळे शहरातील दुकानदारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

व्यंकटेश गौड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते अधिक तपास करित आहेत.


 

Web Title: In Nanded district, thieves have stolen a bag worth five lakhs from a house by showing fear of knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.