शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये काँग्रेसचा हात सोडून ४० माजी नगरसेवक भाजपच्या छायेत; पण मतदार बदलेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:52 IST

खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह महापालिका निवडणूक प्रमुख खासदार डॉ. अजित गोपछडे यांना ‘जुने-नवे’ असे संतुलन साधत रणनीती आखावी लागणार आहे.

नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने राजकीय इतिहास घडवला होता. ८१ पैकी ७३ जागा जिंकत काँग्रेसने महापालिकेवर एकहाती वर्चस्व मिळवले होते. त्या विजयामागे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व केंद्रस्थानी होते. मात्र, आज त्याच अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप नांदेड महापालिकेवर सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे. सत्ता आणि पक्ष बदलले असले, तरी मतदारांचा विश्वासही बदलणार का, हाच खरा प्रश्न आहे. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २०१७ मध्ये काँग्रेसकडून निवडून आलेल्या ७३ पैकी तब्बल ४० नगरसेवकांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये माजी महापौर, उपमहापौर, माजी सभापती यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केलेले अनुभवी नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपकडे सध्या संख्याबळ आणि अनुभव असला, तरी हे सगळे समीकरण प्रत्यक्ष मतपेटीत कितपत उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण यांनी मुस्लिम, दलित आणि वंचित समाजाला सोबत घेऊन स्थानिक राजकारणाची मजबूत बांधणी केली होती. विविध समाजघटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा त्यांचा दृष्टिकोन राहिला आहे. मात्र, त्यांच्या पक्षांतरानंतर मुस्लिम आणि दलित समाजातील बहुतांश नगरसेवकांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. तर काहींनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले तर काही जण एमआयएमच्या वाटेवर आहेत.

महापालिका निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात उभे राहायचे झाल्यास भाजपची उमेदवारी स्वीकारणे अपरिहार्य आहे. मात्र, पक्षांतरित नगरसेवकांना पुन्हा तिकीट मिळते का? आणि मिळाल्यास मतदार त्यांना पूर्वीप्रमाणे स्वीकारतात का? हा राजकीय पेच आहे. स्थानिक निवडणुकांत उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क, केलेली विकासकामे आणि स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरतात, तरीही पक्षनिष्ठा आणि विश्वासघाताचा मुद्दा अनेक मतदारांच्या मनात असतो.

नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची जबाबदारी विद्यमान खासदार रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आहे. जिल्ह्यात त्यांचे नेतृत्व कितपत स्वीकारले जाते, हेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. अल्पसंख्याक आणि दलित समाजातील मतदार अजूनही काँग्रेससोबत असल्याने भाजपसमोरची लढत सोपी नाही.

भाजप नेत्यांना बसवावा लागेल ‘जुने–नव्यांचा’ मेळआजघडीला भाजपमध्ये दाखल झालेले सगळेच इच्छुकांच्या रिंगणात आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांच्याशी दोन हात केलेले आजही भाजपमध्येच असून त्यांचीही दावेदारी आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत अशोकराव चव्हाण यांच्यासह महापालिका निवडणूक प्रमुख खासदार डॉ. अजित गोपछडे यांना ‘जुने-नवे’ असे संतुलन साधत रणनीती आखावी लागणार आहे. पक्षांतरित नगरसेवकांचा अनुभव, भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आणि नव्या समीकरणांचा मेळ घालण्यात यश मिळाल्यासच महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणे शक्य होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Ex-Congress corporators join BJP; will voters change allegiance?

Web Summary : In Nanded, numerous ex-Congress corporators, including key figures, have switched to BJP. The question is whether voters will follow suit, especially given traditional Congress support from minority communities. The BJP faces the challenge of integrating newcomers with loyalists for electoral success.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण