शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

'त्या' घोषणा मी ऐकल्याच नाही; बीड जिल्ह्यातील प्रकारावर मंत्री भागवत कराड यांचे पांघरूण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 15:05 IST

भागवत कराड यांच्या उपस्थितीत मुंडे समर्थकांनी, 'पंकजाताई अंगार है बाकी सब भंगार है' अशा घोषणा दिल्या होत्या.

नांदेड : जन आशीर्वाद यात्रे दरम्यान परळी येथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहीत, मी आशा कोणत्याही घोषणा ऐकल्या नाही, असे म्हणत केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड ( Bhgwat Karad ) यांनी सोमवारी घडलेल्या त्या घटनेवर पांघरूण घातले.

डॉ. कराड हे मंगळवारी नांदेडमध्ये आले होते. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला ( BJP JanAshirwad Yatra ) सोमवारी परळी येथून सुरवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या हस्ते यात्रेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. भागवत कराड यांच्या उपस्थितीत मुंडे समर्थकांनी, 'पंकजाताई अंगार है बाकी सब भंगार है' अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावर पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. या प्रकाराबद्दल कराड यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगितले, तसेच मी कोणत्याही घोषणा ऐकल्याच नाहीत. पंकजाताई आमच्या नेत्या आहेत असे म्हणून त्यांनी झालेल्या प्रकारावर पांघरूण घातले.

परळीत काय घडले होते जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवाती पूर्वी भागवत कराड हे पंकजा मुंडेंच्या परळी येथील घरी आले होते. यावेळी पंकजा यांच्या घराबाहेर मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है...', अशा स्वरुपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. यानंतर भागवत कराड यांच्यासमोरच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहे का? इथे काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का? हे वागणं मला चालणार नाही, असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका, अशा शब्दात पंकजा यांनी कार्यकर्त्यांना झापलं. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBhagwat Karadडॉ. भागवतPritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपाNandedनांदेड