पत्नीस उपचारासाठी घेऊन जाताना पतीचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 06:31 PM2021-10-06T18:31:29+5:302021-10-06T18:34:20+5:30

Accident On Asana River Bridge : जखमीस उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Husband dies in accident while taking wife for treatment | पत्नीस उपचारासाठी घेऊन जाताना पतीचे अपघाती निधन

पत्नीस उपचारासाठी घेऊन जाताना पतीचे अपघाती निधन

Next

- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) :  नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असना पुलावर ( Asana River Bridge) भरधाव ट्रकने मोटरसायकलला उडवले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तुळशीदास बालाजी पुरी (३४) असे मृताचे नाव आहे. ( Husband dies in accident ) 

तालुक्यातील बराड येथील तुळशीदास बालाजी पुरी याची पत्नी कल्पना आजारी असल्याने दोघे पती-पत्नी दुचाकीवर नांदेड येथे उपचारासाठी जात होते. नांदेड-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर असना पुलावर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ( एम.पि.०९ उएच.एफ.७९३१ ) उडवले. यात ट्रकखाली चिरडून तुळसीदास जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी कल्पना गंभीर जखमी झाली. जखमी कल्पनास उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तुळसीदास यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोनि अशोक जाधव, बळीराम राठोड, माहामार्ग पोनि अरूण केंद्रे, पोउनि ज्ञानेश्वर बसवंते आदींनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, महामार्गचे पोलीस कर्मचारी रमाकांत शिंदे, अंकुश वडजे, महेश कात्रे, गजानन डवरे, ज्ञानेश्वर तिडके,सुभाष अलोने, गणेश शेळके आदींनी जखमीस पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

हेही वाचा -  न्यायालयाच्या आवारात उभ्या कारवर झाड कोसळले, सुदैवाने कारमधील चारही वकील बचावले

Web Title: Husband dies in accident while taking wife for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.