घरासमोर खड्ड्यात पुरले चोरीचे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:56 IST2018-12-29T00:52:32+5:302018-12-29T00:56:02+5:30
या महिलेने चोरीचे हे सोने घरासमोरच खड्डा करुन पुरुन ठेवले होते़ पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्याकडून चोरीतील सर्व सोने जप्त केले आहे़

घरासमोर खड्ड्यात पुरले चोरीचे सोने
नांदेड : शहरातील गोविंदराज ज्वेलर्समधून दुकानात काम करणाऱ्या एका महिलेने २३ लाख रुपये किमतीचे सोने लंपास केले़ ही घटना २६ डिसेंबरच्या सायंकाळी घडली होती़ या महिलेने चोरीचे हे सोने घरासमोरच खड्डा करुन पुरुन ठेवले होते़ पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्याकडून चोरीतील सर्व सोने जप्त केले आहे़
वंदना विठ्ठलराव तांदळे (वय ३९, रा़चिखलवाडी ता़भोकर) असे महिलेचे नाव आहे़ गेल्या दीड वर्षांपासून ही महिला गोविंदराज ज्वेलर्स येथे कामाला होती़ या ठिकाणी दुकानातील प्रत्येकाकडे एक काऊंटर देण्यात आले आहे़ येणाºया ग्राहकांना काऊंटरमध्ये असलेल्या डब्यातील सोने काढून दाखविण्याचे काम वंदना तांदळे यांच्याकडे होते़ २६ डिसेंबर रोजी वंदना तांदळे हिने आपल्याजवळील पर्स सोन्याच्या डब्याजवळ ठेवली होती़ सायंकाळी आपले काम आटोपल्यानंतर कॅरिबॅगमध्ये पर्ससह २३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा डबा टाकून ती दुकानाबाहेर पडली़ हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता़
सायंकाळी दिवसभराच्या व्यवहाराची तपासणी केल्यानंतर काऊंटरमधील दागिन्यांचा एक डबा गायब असल्याचे दुकानमालक निलेश तापडीया यांच्या लक्षात आले़ त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, वंदना तांदळे यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या़ त्यांनी लगेच याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ़ अक्षय शिंदे, उपअधीक्षक अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि़ संदीप शिवले, पोउपनि किरण पठारे, अमोल कडू, नमिता देशमुख, पोहेकॉ़ शेख गौस शेख नबी, नागिनी मुंढे यांनी २४ तासांच्या आत आरोपी वंदना तांदळे यांच्या मुसक्या आवळल्या़ उडवाउडवीची उत्तरे देणाºया तांदळे यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांनी घरासमोरील खड्ड्यात पुरुन ठेवलेले २३ लाख रुपये किमतीचे सोने पोलिसांच्या हवाली केले़ या प्रकरणी वंदना तांदळे हिच्याविरोधात वजिराबाद ठाण्यात गुन्हा नोंद झाला़
सीसीटीव्हीमुळे लागला आरोपीचा शोध
गोविंदराज ज्वेलर्सच्या तापडिया यांना सायंकाळी हिशेब करत असताना काऊंटरमधील दागिन्यांचा एक डबा गायब असल्याचे लक्षात येताच धक्का बसला़ त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, वंदना तांदळे या कॅरिबॅगमध्ये डब्याच्या आकाराची वस्तू घेवून जात असल्याचे दिसून आले़ सुरुवातीला तांदळे हिने मात्र कॅरिबॅगमध्ये स्वेटर घेवून जात होते, असे पोलिसांना सांगितले होते़