नांदेड विभागातील २५९ रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:42 PM2021-02-09T13:42:23+5:302021-02-09T13:44:56+5:30

नांदेड विभागात यावर्षी ११० व्यक्तिगत आणि २३ सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Honoring 259 railway employees from Nanded division | नांदेड विभागातील २५९ रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव

नांदेड विभागातील २५९ रेल्वे कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव

googlenewsNext
ठळक मुद्दे२३ सांघिक पुरस्कारांमध्ये १२६ कर्मचाऱ्यांना रेल्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी नांदेड रेल्वे विभागाला तीन शिल्ड (ढाल) मिळाल्या आहेत.

नांदेड : नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात ६५ वा रेल्वे सप्ताह पुरस्कार सोहळा (डी.आर.एम. अवाॅर्ड) ८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. कोविड-१९ च्या प्रभावामुळे यावर्षी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरस्कार वितरण करण्यात आले. मुख्य कार्यक्रम नांदेड विभागीय कार्यालयात साजरा झाला. पूर्णा, औरंगाबाद, अकोला येथे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी डी.आर.एम. पुरस्काराचे वितरण केले. जवळपास २५९ कर्मचाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नांदेड विभागात यावर्षी ११० व्यक्तिगत आणि २३ सांघिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. २३ सांघिक पुरस्कारांमध्ये १२६ कर्मचाऱ्यांना रेल्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी अप्पर विभागीय रेल्वे प्रबंधक नागभूषण राव, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जय शंकर चौहान आदी उपस्थित होते. नांदेड विभागाने दक्षिण मध्य रेल्वेमध्ये क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे. यावर्षी नांदेड रेल्वे विभागाला तीन शिल्ड (ढाल) मिळाल्या आहेत. ज्यात उत्कृष्ट रेल्वे पटरी (बेस्ट ट्रेक), उत्कृष्ट सुरक्षा (सेफ्टी) आणि नवकल्पना (इनोव्हेशन्स) या तीन शिल्डचा समावेश आहे. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी सर्वांचे कौतुक केले.

प्रारंभी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात नांदेड विभागाने केलेल्या कार्याची माहिती दिली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्य करण्याकरिता सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. सुरक्षित, सुखद प्रवास हे नेहमी आपले प्राधान्य राहिले पाहिजे, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले. यावर्षी मुदखेड ते परभणीदरम्यान दुहेरीकरण पूर्ण करण्यात आले. यावर्षी नांदेड रेल्वे विभागात ४२६ नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, तर ५४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. किनवट आणि मुदखेड येथे कर्मचारी शिकायत शिबिर आयोजित केले गेले. सर्व रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा प्रदान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Honoring 259 railway employees from Nanded division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.