शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

किनवट-माहूर तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 6:49 PM

किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़

नांदेड : किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ मे महिन्यातील प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़ दरवर्षी उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे़ 

किनवट : पैनगंगा नदी व मोठ्या नाल्याच्या काठावरील किनवट शहरातील पाणीपातळी पार खोल गेल्याने शहराच्या अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ जवळपास ११ वस्त्यांमध्ये पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे़ शहरात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडत असून पाणी मिळविण्यासाठी धावपळ सुरू होते़ 

दररोज तीन हजार लिटरच्या तीन व पाच हजार लिटरच्या तीन अशा एकूण सहा टँकरने २ लाख ४० हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे़ २८ हजार ४५४ लोकसंख्या असलेल्या शहरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी  उन्हाळ्यात निर्माण होतो़ ३० विंधन विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे नगर परिषद सांगत आहे़ मात्र रामनगर, जुनी कापडलाईन, सराफा लाईन, जफारखान नगर, धोबी गल्ली, भोई गल्ली, बाबा रमजान, विठ्ठलेश्वर मंदिर, लोहार गल्ली, मोमीनगुडा, साईनगर, इस्लामपुरा, गंगानगरसह अन्य भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे़ नगराध्यक्ष आनंद मच्छेवार व उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांच्या टीमने पाणी कसे मिळेल यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

आ़प्रदीप नाईक यांनीसुद्धा पाणीटंचाई पाहता आमदार निधीतून तीन टँकर नगरपालिकेला देऊन  दिलसा दिला़ उल्लेखनीय म्हणजे, पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा असून वेळीच वॉल्व्ह व गेट न टाकल्याने बंधारा कुचकामी ठरत आहे़ शिवाय शहरालगतच्या नाल्यावर दोन बंधारे असूनही त्याही बंधाऱ्याची तीच परिस्थिती आहे़ बंधारे बांधून मोकळे झाले असले तरी बंधाऱ्यात पाणी साठते की नाही, याचे ना नगरपालिकेला देणे आहे ना संबंधित खात्याला? त्यामुळे बंधारे बांधून उपयोग काय? असा प्रश्न विचारला जात आहे़ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले तरी भूगर्भच कोरडाठाक असल्याने पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे़

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील रूई येथे मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी  पायपीट कराव्या लागणाऱ्या गावकऱ्यांना घागरभर पाणी दुरापास्तच झाले होते. ही परिस्थिती समजून माजी सरपंच गुमानसिंग चुंगडे यांनी आपल्या शेतातून स्वखर्चाने पाईपलाईन केली. स्वतंत्र नळाद्वारे गावात पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे गावकऱ्यांचे चेहरे समाधानाने उजळले आहेत.

माहूर तालुक्यात मागील तीन वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत आहे. यंदा तर सरासरीपेक्षा निम्म्याहूनही खूप कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी डिसेंबर महिन्यातच नदी- नाले कोरडे पडले. विहिरी आटल्या, हातपंप (बोअरवेल) पाण्याच्या जागी हवा फेकू लागले, अशी भयावह परिस्थिती माहूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांत निर्माण झाली. काही गावांत पाणीपुरवठ्याच्या योजना अर्धवट तर काही गावांतील पाणीपुरवठा पैनगंगा नदीवर अवलंबून असल्याने कोरडीठाक पडलेली नदी पाणीपुरवठा योजनेसाठी आडकाठी झाली. अशात शासनाचे टँकर काही गावांत तर काही गावांत खाजगी टँकर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आपआपल्या परिने  पाठवित आहेत. परंतु, मौजे रुई येथील माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गुमानसिंग चुंगडे यांनी गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतातील विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी गावात आणले व घरासमोर नळाची स्वतंत्र व्यवस्था करून गावकऱ्यांसाठी हे नळ सार्वजनिक केले. त्यामुळे गावातील नागरिकांची तहान भागत असून गुमानसिंग यांच्या या स्तुत्य उपक्रमाने पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आ़ प्रदीप नाईक, जि़प़चे उपाध्यक्ष समाधान जाधव, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी यु़डी़मंडाळे यांनी केले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड