हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 11:20 IST2021-10-09T11:19:48+5:302021-10-09T11:20:05+5:30
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ (शंकरनगर) पोलीस ठाण्यात चंद्रकांत माधवराव चाटे पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते.

हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
नांदेड : पोलीस नाईक चंद्रकांत माधवराव चाटे (४५) यांनी आपल्या मुळगावी माळाकोळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी ( दि. ८ ) सायंकाळी उघडकीस आली. पोलीस नाईक चंद्रकांत चाटे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ (शंकरनगर) पोलीस ठाण्यात चंद्रकांत माधवराव चाटे पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. ९ ) सकाळी ११ वाजता मुळगावी माळाकोळी(ता.लोहा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, एक मुलगी व जावई असा परिवार आहे.