शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलकांचा गनिमीकावा; लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढणार हजारो उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 18:46 IST

राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार संघात देखील मराठा आंदोलक हजारो उमेदवार देणार आहेत 

 - गोविंद टेकाळे अर्धापूर (जिल्हा नांदेड) : मागील कांही महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलन वेगवेगळ्या प्रकाराने चर्चेत येत असून  मराठा आरक्षणावरून शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा समाजाकडून होत आहे. त्यातच शासनाने मराठा यौध्दा मनोज जरांगे पाटील यांची एस.आय. टी. मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिल्याने मराठा आंदोलक संतप्त झाले. त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबर गनिमी कावा करण्याची तयारी मराठा समाजाने चालविली आहे. याच अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यभरातून मराठा समाज प्रत्येक लोकसभा मतदार संघात किमान एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अर्धापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. 

राज्यातील मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गामधून आरक्षण आणि ' सगेसोयरे ' च्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. त्यांच्या या लढ्याला मराठा समाजाची देखील साथ मिळत आहे. याच मागणीसाठी सकल मराठा समाजा कडून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. मात्र शासनाकडून कुठलीच दखल घेतली जातं नाही. उलट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी एस.आय.टी. लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये शासना विरोधात नाराजी पसरली आहे. तेंव्हा रस्त्यावरील आंदोलना सोबतच गमिनीकावा करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. 

प्रत्येक गावातून दहा उमेदवार असे एकूण नांदेड जिल्ह्यात एक हजार उमेदवार निवडणूकीच्या रिंगण्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दि.२९ फेब्रुवारी गुरूवार रोजी सायंकाळी अर्धापूर तालुक्यात मराठा समाजाची बैठक देखील पार पडली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शेकडोंच्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाच्या या निर्णयामुळे येणारी निवडणुक सर्वच पक्षासाठी आव्हानात्मक असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

निवडणूक विभागाची होणार दमछाकमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने निवडणूक विभाग आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार असून एका कंट्रोल युनिटवर २४ बॅलेट युनिट लावता येतात. १ बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांच्या चिन्हांची बटणे असतात. एकूण २४ युनिटवर ३८४ उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचा समावेश व 'ईव्हीएम' ची क्षमता असते. जर ३८४ पेक्षा जास्त उमेदवार झाले तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याशिवाय निवडणूक आयोगासमोर पर्याय नसतो. त्यामुळे शासनाला अडचणीत आणण्यासाठी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करून मराठा समाज गनिमी कावा करणार आहे. जर असे झाले तर मात्र निवडणुक विभागाची मोठी दमछाक होणार आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेड