Grampanchayat Result: चुरशीच्या लढतीत माहूरात महाविकास आघाडीची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 06:16 PM2022-12-20T18:16:46+5:302022-12-20T18:17:48+5:30

भगवती, बंजारातांडा, शेकापूर या ग्रामपंचायतीत सरपंच बिनविरोध होते.

Grampanchayat Result: Mahavikas Aghadi wins in Mahur in a tight fight | Grampanchayat Result: चुरशीच्या लढतीत माहूरात महाविकास आघाडीची बाजी

Grampanchayat Result: चुरशीच्या लढतीत माहूरात महाविकास आघाडीची बाजी

Next

माहूर (नांदेड) : माहूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर झाला. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस- १०, शिवसेना उद्धव ठाकरे- ७, भाजप -१, गोर सेना- १, सचिन नाईक मित्रमंडळ २, अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. 

दरम्यान, २६ ग्रामपंचायती पैकी भगवती, बंजारातांडा, शेकापूर या ग्रामपंचायतीत सरपंच बिनविरोध होते. वसराम नाईक तांडा ग्रा,प. निवडणूकीवर बहिष्कार तर हिंगणी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी  नामनिर्देशन पत्र न दाखल झाल्याने उर्वरित २२  ग्रा.प. साठी निवडणूक झाली.  
या टप्प्यातील लक्षवेधी असलेल्या वानोळा ग्रामपंचायतमध्ये अभिजित राठोड यांच्या पॅनलने तर लखमापूर  ग्रामपंचायत मध्ये गणेश राठोड, लांजी ग्रामपंचायतमध्ये  मारोती रेकुलवार  यांच्या पॅनलने सरपंच पदासह सदस्य पदावर  संपूर्ण पॅनल निवडून आणले. 

या मतमोजणी दरम्यान मालवाडा ग्रा.प. च्या प्रभाग क्र. एक चे मतदान यंत्र तांत्रिक अडचण आल्याने सुमारे एक तास मतमोजणीस विलंब झाला.
आज झालेल्या मतमोजणी मध्ये पाचोंदा-  विलास तानबा तोरकड, महादापूर-प्रतिभा सुभाष आडे, पवनाळा- प्रविका इंदल राठोड,मालवाडा-  सुनीता लक्ष्मण  बेहरे,पानोळा-रमेश बाबुलाल कुडमेथे , गुंडवळ-   रामेश्वर किशन जाधव,  इवळेश्वर-वंदना दूधराम राठोड, पडसा- रुखमाबाई माधव आरके,  बंजारातांडा - दुर्गाबाई जयवंत उर्वते (बिनविरोध), मछीद्रापार्डी- जयश्री प्रकाश वाढवे, दिगडी (कु ) -बाळू सुखदेव तिळेवाड, मांडवा -सीमाबाई गणेश राठोड   दत्तमंजारी - सुलोचना अर्जुन पवार, वायफनी -गोकर्णा  सुरेश अंकुरवार, भोरड -जनार्धन हुसेन धुर्वे, कुपटी -प्रफूल बंडू  भुसारे, रुई - लता गणेश  राऊत, भगवती रुक्मिबाई नागोराव मडावी( बिनविरोध),  लांजी मारोती बंडू  रेकुलवार, बोरवाडी - अंजली  गजानन राठोड,  शेकापूर सीमा राजू धबडगांवकर ( बिनविरोध), शे. फ. वझरा- दीपक संभाजी केंद्रे,वानोळा- सुनीता देवराव सिडाम,तांदळा - दुर्गा संतोष जाधव,लखमापूर - गणेश दतरराम राठोड  हे सरपंचदावर निवडून आले. 
                
निवडणूक आयोगा तर्फे मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ६  टेबल वर १४ फेऱ्यामध्ये मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणी स.१०:०० वा सुरु होऊन ३:३० वा. पूर्ण करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी उत्कृष्ट नियोजन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी  विजय डोंगरे  यांच्या मार्गदर्शनात माहूरचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे,  अण्णासाहेब पवार, संजय पवार गोपनीय शाखेचे खामनकर, गजानन इंगळे, यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणतेही अनुचित प्रकार न घडता मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.

Web Title: Grampanchayat Result: Mahavikas Aghadi wins in Mahur in a tight fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.