ग्रा.पं.कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:23 IST2018-12-01T00:22:57+5:302018-12-01T00:23:29+5:30
ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान, बळीरामपूर (ता. नांदेड) येथील ग्रा. पं. कार्यालयात घडली.

ग्रा.पं.कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
नवीन नांदेड : बळीरामपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात नमुना नं. ८ चा उतारा मागण्यासाठी आलेल्या एका तरूणाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान, बळीरामपूर (ता. नांदेड) येथील ग्रा. पं. कार्यालयात घडली.
बळीरामपूर येथील रहिवासी संभाजी नारायणराव कलवले नावाचा तरूण ३० नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेदोन वाजेदरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयात आला. दरम्यान, संभाजी कलवले याने कार्यालयातील लिपिक रघुनाथ कसबे यांना तुम्ही मला नमुना नंबर आठचा उतारा द्या, असे म्हणाला. मात्र, लिपिक रघुनाथ दिगंबर कसबे यांनी त्यास तुला नमुना नंबर ८ चा उतारा देता येत नाही, घर तुझ्या वडिलाच्या नावावर आहे, असे म्हणाले.
त्याचवेळी, संभाजी कलवले याने खिशामधील पेट्रोलची बॉटल काढून पेट्रोल अंगावर टाकून घेतले अन् काडी पेटवून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप ग्रामपंचायत कार्यालयाचे लिपिक रघुनाथ कसबे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़