शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात अनाथ मुलांच्या मदतीला धावले शासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST

मार्च, २०२० पासून उद्‌भवलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८६८ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये ...

मार्च, २०२० पासून उद्‌भवलेल्या कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८६८ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये अनेक बालकांना आपले माता-पिता गमवावे लागले आहेत. या मुलांचा मुख्य आधारच कोरोनाने हिरावला आहे. त्यांना आता शासन स्तरावरून मदत देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. ० ते १८ वयोगटांतील अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे. या मुलांची महिला व बालकल्याण विभागाकडे गृहभेटीद्वारे चौकशी केली जात आहे. त्यांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

चौकट------------

शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत यापूर्वी ४२५ रुपये मदत मिळत होती. ६ एप्रिलच्या नव्या आदेशानुसार, ती मदत आता १,१०० रुपयांपर्यंत करण्यात येत आहे. कोरोनात आई किंवा वडील यातील एकाचा मृत्यू झाल्यास ही मदत केली जाणार आहे. जिल्ह्यात अशा मुलांची संख्या १८६ आहे. पूर्वी १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा शोध घेतला जात होता, आता त्यात २३ वर्षांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

चौकट----------------

कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांना आवश्यक ती मदत शासनाकडून केली जाणार आहे. त्यामध्ये राहण्याची व्यवस्था, शिक्षण, कायदेविषयक मदत या सर्व बाबींचा समावेश आहे. याबाबत अद्याप सुस्पष्ट धोरण ठरले नसले, तरीही अनाथ झालेल्या मुलांना एकटे झाल्याची भावना निर्माण होऊ नये, याचा प्रयत्न शासन स्तरावर केला जात आहे.

कोट-----------

जिल्ह्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या अडचणीत सापडलेल्या बालकांचा शोध सुरू आहे. टास्क फोर्सचीही स्थापना झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. अनाथ मुलांच्या राहण्यासाठी व्यवस्थाही निश्चित करण्यात आली आहे.

- रेखा काळम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, नांदेड.