शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वसतिगृहाचे उद्घाटन न करताच राज्यपाल निघाले; साधी पाहणीही केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 2:30 PM

Governor bhagat Singh Koshyari visit's Nanded : वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही.

ठळक मुद्देनवाब मलिक यांचा, या वसतिगृहाचे उदघाटन राज्यपाल कसे करू शकतात असा सवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या उदघाटन कार्यक्रमास विरोध दर्शविला होता.

नांदेड : राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील वसतिगृहाचे उदघाटन करण्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टाळले. आज दुपारी उदघाटन करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या समोरून राज्यपालांचा ताफा गेला, मात्र त्यांनी तिथे थांबून साधी पाहणीही केली नाही.

दरम्यान, नवाब मलिक यांनी या वसतिगृहाचे उदघाटन राज्यपाल कसे करू शकतात असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे राज्यपालांनी उदघाटन आणि पाहणी समारंभ टाळला असावा अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या उदघाटन कार्यक्रमास विरोध दर्शविला होता. नांदेड येथील वापरात असलेल्या वसतीगृहाचे उद्घाटन राज्यपाल यांच्या हस्ते करून काय सिद्ध होणार ? जुन्या इमारतीच्या उद्घाटनाचा अट्टहास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. राज्यपालांच्या हस्ते नवीन इमारत, नवीन शैक्षणिक उपक्रम, विद्यापीठातील नवीन वसतिगृह, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उपक्रम असे समारंभ करणे हा त्यांच्या पदाचा सन्मान ठेऊन घेणं अपेक्षित आहे. चार वर्षे वापरात असलेल्या इमारतीचे उद्घाटन नाही. असेही सामंत म्हणाले आहेत.

'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालाकडून कौतुक 

विद्यापीठ परिसराची केली पाहणीराज्यपालांना विविध विकास कामाची चित्रफीत दाखविण्यासाठी विद्यापीठात तयारी केली होती, पण ऐनवेळी राज्यपाल म्हणाले, ही माहिती मला नंतर दाखवली तरी चालेल, मला समोरच्या इमारतीवरून परिसर पाहायचा आहे.  त्यामुळे या ठिकाणचे नियोजन बिघडले. राज्यपाल थेट गणित संकुलाकडे गेले, या वेळी त्यांच्यासोबत निवडक अधिकारी होते, राज्यपाल नेमके कुठे गेले हे अनेकांना माहीत नव्हते. बऱ्याच वेळेनंतर कलेक्टर त्या दिशेने पळाले, तर कुलगुरू डॉ. भोसले हे राज्यपाल गाडीत बसल्यानंतर धावतच आपल्या गाडीत बसले. यावेळी त्यांची चांगलीच धावपळ उडाली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड