'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 01:23 PM2021-08-05T13:23:46+5:302021-08-05T13:24:55+5:30

Governor Bhagatsinh Koshyari's Nanded Visit : नियोजित कार्यक्रम सोडून राज्यपाल थेट गणित संकुलाकडे गेले, या वेळी त्यांच्यासोबत निवडक अधिकारी होते.

'I'm happy'; Appreciation from the Governor Bhagatsinh Koshyari for the SRT University's water recharge project | 'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक 

'मै खुश हुआ'; विद्यापीठातील जल पुनर्भरणाच्या प्रकल्पाचे राज्यपालांकडून कौतुक 

Next

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जल पुनर्भरण प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर प्रसन्न झालेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी, 'मै खुश हुआ' असे म्हणत छायाचित्रकारांना आनंदी मुद्रेत पोझ दिली. यावेळी विद्यापीठातील महिला कर्मचाऱ्यासोबत सेल्फी ही त्यांनी घेतली.

राज्यपालांना विविध विकास कामाची चित्रफीत दाखविण्यासाठी विद्यापीठात तयारी केली होती, पण ऐनवेळी राज्यपाल म्हणाले, ही माहिती मला नंतर दाखवली तरी चालेल, मला समोरच्या इमारतीवरून परिसर पाहायचा आहे.  त्यामुळे या ठिकाणचे नियोजन बिघडले. राज्यपाल थेट गणित संकुलाकडे गेले, या वेळी त्यांच्यासोबत निवडक अधिकारी होते, राज्यपाल नेमके कुठे गेले हे अनेकांना माहीत नव्हते. बऱ्याच वेळेनंतर कलेक्टर त्या दिशेने पळाले, तर कुलगुरू डॉ भोसले हे राज्यपाल गाडीत बसल्यानंतर धावतच आपल्या गाडीत बसले. यावेळी त्यांची चांगलीच धावपळ उडाली.

दौऱ्यावरून कोण राजकारण करतेय ? सर्वात जास्त भीती मीडियापासून वाटते : राज्यपाल

नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती
विद्यापीठातील कार्यक्रमा दरम्यान भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंगजी, सुभाषचंद्र बोस यासारखे महापुरुष माझ्यासाठी राम, कृष्ण या दैवताप्रमाणे आहेत. परंतु या महापुरुषांच्या बलिदानाचा आज विसर पडत चालला आहे हे दुर्दैव आहे, अशी खंत राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केली. मला लोकांमध्ये मिसळून रहायला आवडते. लोकांमध्ये गेलेल्या अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात कुठे जाता आले नाही. परंतु, गुरू गोविंद सिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत येण्याची खूप इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. असेही राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

Web Title: 'I'm happy'; Appreciation from the Governor Bhagatsinh Koshyari for the SRT University's water recharge project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.