शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने चीनसारखा कायदा करावा : योगगुरू रामदेवबाबा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 12:59 IST

भारतातही आता कायद्याची गरज आहे.

ठळक मुद्देचीनसारखा भारत सरकारने कायदा करावाराममंदिर हा लोकांच्या आस्थेचा विषय

नांदेड :  देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजघडीला १२५ कोटी आधारकार्ड तयार झाले आहेत. ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर देशाचा विकास थांबेल. चीनने लोकसंख्येबाबत कठोर कायदा केल्यानेच लोकसंख्या नियंत्रणात आली. भारतातही आता कायद्याची गरज आहे. असे प्रतिपादन  योगगुरू रामदेव बाबा यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी नांदेडमध्ये होणाºया राज्यस्तरीय योग शिबिरासाठी योगगुरु रामदेवबाबा गुरुवारी नांदेडमध्ये दाखल झाले. पत्रकार परिषदेत बोलताना रामदेवबाबा यांनी लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली.  ते म्हणाले, जन्म घालणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण त्या पाल्यांचे पालनपोषण करणे गरजेचे आहे. जन्म देवून मुले सोडून देणाऱ्यावरही आता कारवाईची गरज आहे.  काळा पैसा भारतात आणण्यासंदर्भातील विषय आपण अद्याप सोडला नसल्याचेही ते म्हणाले. एक देश, एक चुनाव या भूमिकेचेही त्यांनी समर्थन केले. योगासंदर्भात बोलताना योग हा सर्व व्याधी दूर करण्याचा उपाय असल्याचे सांगितले. योगामुळे ९९ टक्के आजार दूर होतात. पतंजलीच्या माध्यमातून योगदिनानिमित्त उद्या देशात तीन ते चार कोटी लोक योग करतील तर जगात १५ ते २० कोटी लोक जागतिक योग दिनानिमित्त योगा करतील, असेही ते म्हणाले. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख आदींची उपस्थिती होती.

योगामुळे विरोधकांचेही मनोबल वाढेलदेशातील राजकीय परिस्थिती पाहता विरोधक कमी झाले आहेत. योग हा सर्वांनीच करणे आवश्यक आहे. आज पंतप्रधान, मुख्यमंत्री योगा करीत आहेत. विरोधकांनीही योगा केल्यास त्यांचे मनोबल वाढेल, आत्मविश्वास वाढेल. आगामी काळात त्यांची संख्याही वाढेल, असा टोला रामदेवबाबा यांनी लगावला.  योग हा कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही. नांदेडमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदाच आपले स्वागत सना उर्दू माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.

राममंदिरासाठी कायदा करावा

राममंदिराचा प्रश्न हा न्यायालयात असला तरीही तो लोकांचा व देशाच्या आस्थेचा विषय आहे. राममंदिर प्रश्नासंदर्भात नेमलेल्या मध्यस्थांकडून हा प्रश्न सुटेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे सरकारनेच कायदा करावा अन्यथा लोक स्वत:च राममंदिर उभारतील, असे रामदेवबाबा म्हणाले.

टॅग्स :GovernmentसरकारNandedनांदेडYogaयोग